आपल्या सहलीचे फोटो इन्स्ट्राग्रामवर टाकायचे आहेत का? मग या टिप्स वाचाच! इन्स्ट्राग्रामवर टाकण्यासाठी फोटो कसे हवेत हे या टिप्स वाचूनच कळेल!
By Admin | Updated: June 8, 2017 18:11 IST2017-06-08T18:11:10+5:302017-06-08T18:11:10+5:30
फेसबुक आणि स्पेशली इन्स्टाग्रामवर तुमचे प्रवासाचे अनुभव फोटो रुपानं शेअर करणार असाल तर या टीप्स आवर्जून वाचा आणि वापरून पाहा.

आपल्या सहलीचे फोटो इन्स्ट्राग्रामवर टाकायचे आहेत का? मग या टिप्स वाचाच! इन्स्ट्राग्रामवर टाकण्यासाठी फोटो कसे हवेत हे या टिप्स वाचूनच कळेल!
- अमृता कदम
प्रवासाहून परत येताना तिथे काढलेल्या फोटोंच्या रूपातून आपण खूप सारे आनंदाचे क्षण आणि आठवणी सोबत घेवून येत असतो. . फोटोंच्या रूपानं हा आनंद आपल्यासोबत कायम राहतो. आता तर सोशल मीडियामुळे आपण आपले प्रवासातली धमाल मस्ती, मेमोरेबल क्षण चटकन, अगदी त्याचक्षणी आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करु शकतो. तुम्हीही जर ट्विटर, फेसबुक आणि स्पेशली इन्स्टाग्रामवर तुमचे प्रवासाचे अनुभव फोटो रुपानं शेअर करणार असाल तर या टीप्स आवर्जून वाचा आणि वापरून पाहा. इन्स्टाग्रामसाठी परफेक्ट फोटो क्लिक करायला तुम्हाला त्यांची नक्की मदत होईल.
आणि तसंही केवळ स्वत:च्याच वेगवेगळ्या पोझेस शेअर करण्यात काय मजा? इन्स्टाग्रामवर तुमच्या फोटोंच्या रूपानं अख्खा ट्रॅव्हललॉगच शेअर करता येतो पण त्यासाठी ते फोटो अधिक उत्तम कसे येतील, फोटोच आपल्या प्रवासाबद्दल कसे बोलतील यासाठी थोडे प्रयत्न करावे लागतातचं!