शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

येथे रावण, दुर्योधन, शकुनी अन् पुतना मावशीची पुजा केली जाते, कुठे आहेत ही राक्षसांची मंदिरे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2022 21:02 IST

तुम्हाला माहित आहे का की अशी काही मंदिरे आहेत जिथे देवांची नाही तर राक्षसांची पूजा केली जाते? जाणून घ्या अशाच काही मंदिरांबद्दल.

हिंदू धर्मात देवतांच्या तेहतीस श्रेणी सांगितल्या आहेत. या देवतांना खूप शक्तिशाली मानले जाते. असे मानले जाते की जेव्हा जेव्हा पृथ्वीवर धर्म आणि अधर्मामध्ये असंतुलनाची परिस्थिती निर्माण होते तेव्हा हे देवता पृथ्वीवर येतात आणि राक्षसांना मारतात आणि लोकांना संकटांपासून वाचवतात. यामुळे हिंदू धर्मातील लोकांची त्यांच्या देवतांवर गाढ श्रद्धा आहे.

असे मानले जाते की पृथ्वीचे संचालन या देवी-देवतांकडून केले जाते. देशाच्या सर्व भागांमध्ये विविध देवी-देवतांची मंदिरे आहेत, जिथे लोक सकाळी आणि संध्याकाळी या देवतांची पूजा करतात. पण तुम्हाला माहित आहे का की अशी काही मंदिरे आहेत जिथे देवांची नाही तर राक्षसांची पूजा केली जाते? जाणून घ्या अशाच काही मंदिरांबद्दल.

पुतना मंदिरपूतना राक्षसी होती. जेव्हा भगवान विष्णू कृष्णाच्या रूपात जन्माला आले तेव्हा कंसाने कृष्णाला मारण्यासाठी पुतनाला पाठवले. पुतना माता म्हणून श्रीकृष्णाला दूध पाजण्याच्या बहाण्याने विष पाजण्याचा प्रयत्न केला, पण श्रीकृष्णाने दूध पिण्याच्या बहाण्याने तिचा खून केला. गोकुळात आजही पुतना मंदिर आहे. या मंदिरात पुतण्याची पडून असलेली मूर्ती आहे. ज्यावर कृष्ण छातीवर बसून दूध पिताना दिसत आहे.

हिडिंबा मंदिरहिडिंबा ही पराक्रमी भीमाची पत्नी होती आणि ती राक्षसी होती. राक्षसी असूनही त्यांनी धर्माचे समर्थन केले. हिमाचलच्या मनालीमध्ये हिडिंबाचे मंदिर असून तिची नियमित पूजा केली जाते.

शकुनीचे मंदिरलबाडी, कपट आणि कुप्रसिद्धी यात पारंगत समजल्या जाणाऱ्या शकुनीला कोण ओळखत नाही. मामा शकुनीमुळे महाभारत युद्ध झाले. शकुनीला खलनायकाच्या भूमिकेत पाहिले जाते. पण या खलनायकाचे मंदिर केरळच्या कोल्लम जिल्ह्यात बांधले आहे. लोक या मंदिरात तांत्रिक विधी करण्यासाठी येतात आणि दर्शन घेताना शकुनीला नारळ आणि रेशमी वस्त्रे अर्पण करतात.

दुर्योधन मंदिरदुर्योधनाचे मंदिर केरळच्या कोल्लम जिल्ह्यातही बांधले आहे. शकुनीच्या मंदिरापासून हाकेच्या अंतरावर हे मंदिर आहे. कुरु वंशात जन्मलेल्या दुर्योधनात राक्षसी प्रवृत्ती होती, पण तरीही त्याची पूजा केली जाते. येथे त्यांना देशी दारु ताडी, लाल कपडे, नारळ, पान इ. नैवेद्य दाखवला जातो. याशिवाय उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात दुर्योधनाचे मंदिर आहे. दुर्योधनाचे मंदिर 'हर की दून' रोडवर असलेल्या सौर गावात नेटवर नावाच्या ठिकाणापासून १२ किमी अंतरावर आहे. येथून काही अंतरावर कर्णाचे मंदिरही बांधले आहे.

रावणाचे मंदिरमध्य प्रदेशातील विदिशामध्ये त्रेतायुगातील रावणाचे मंदिर आहे. विदिशा जिल्ह्यातील नटेरन तालुक्यात रावण नावाचे एक गाव आहे, जिथे रावणाच्या पडलेल्या पुतळ्याची पूजा केली जाते. या ठिकाणी रावणबाबाची पूजा केली नाही तर कोणतेही कार्य यशस्वी होऊ शकत नाही, अशी येथील लोकांची श्रद्धा आहे. याशिवाय कानपूरमध्ये रावणाचे मंदिर आहे. हे मंदिर वर्षातून फक्त दोन दिवस दसऱ्याच्या दिवशी उघडले जाते. या दिवसात रावणाच्या मूर्तीला दुधाने आंघोळ घालण्यात येते आणि नंतर त्यांची पूजा केली जाते. याशिवाय इतर काही ठिकाणी रावणाचे मंदिरही बांधले आहे.

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्स