शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
6
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
8
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
9
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
10
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
11
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
12
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
13
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
14
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
15
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
16
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
17
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
18
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
19
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
20
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?

'कॅराव्हॅन पर्यटन': बबलसारखे सुरक्षित, घरासारखे आरामदायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2022 14:15 IST

कस्टमाईज पद्धतीने बनवलेली शैलीदार वाहने व सहज व सुलभ राईड आणि आरामदायक मुक्कामासाठी सर्व प्रकारे सुसज्ज असे कॅराव्हॅन पर्यटन हे केरळ पर्यटनामधील पुढची सर्वांत मोठी गोष्ट आहे.

थिरूअनंतपूरम: पुढे जेव्हा केरळमधील असाधारण ग्रामीण भाग, तेथील वाहते बॅकवॉटर किंवा निसर्गरम्य व दुर्गम हिलस्टेशन्स आपल्या प्रवासाच्या योजनेमध्ये येतील, तेव्हा आपल्याला एक स्वयंपूर्ण असे "चाकांवरील घर" निवडण्याचा मोह होईल, कारण तिथे आपल्याला अशा सर्व सुविधा मिळतील ज्यामुळे ते आपले घरापासून दूर असलेले घर ठरेल. आपण एखादे रोमँटीक कपल असाल, शहरातील गोंधळापासून दूर एकत्र चांगला वेळ घालवू इच्छिणारे कुटुंब असाल किंवा साहसप्रिय बॅकपॅकर असाल, कॅराव्हॅन्स आपल्याला मनसोक्त, शाश्वत आणि जबाबदारीने प्रवास करण्याचे स्वातंत्र्य देते व तेही स्वच्छता, सुरक्षितता आणि सोशल डिस्टन्सिंगची पूर्ण काळजी घेऊन.  

त्यातून मिळणाऱ्या स्वातंत्र्यामुळे व फ्लेक्सिबिलिटीमुळे कॅराव्हॅन पर्यटनाच्या संकल्पनेला जगभर मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. महामारीच्या परिस्थितीमुळे सर्व जण काळजीमध्ये असतानाच या पद्धतीमध्ये आता घरापासून गंतव्य स्थळापर्यंत व परत अशा पूर्ण प्रवासामध्ये संपूर्ण सुरक्षित असे प्रवासाठीच्या बायो बबलचे लाभ मिळतात.

आता कोरोना काळामध्ये प्रवासामध्ये जोखीम व अडथळे येतात असे वाटणाऱ्या प्रत्येकासाठी आता हा पर्याय अतिशय योग्य व परिपूर्ण आहे. प्रवास करायला आवडणाऱ्या अनेकांना विमानतळावर होणारे उशीर व सार्वजनिक आरामगृह वापरण्याचा पर्याय आवडत नसतो. बाहेरचे जेवण आणि आरोग्याची स्थिती, काहीही माहीत नसलेल्या अनोळखी लोकांसोबत एअर कंडीशन्ड ट्रेनमधून केलेल्या प्रवासामुळेही लोकांना तणाव होतो व त्याचा त्रास होतो.

कस्टमाईज पद्धतीने बनवलेली शैलीदार वाहने व सहज व सुलभ राईड आणि आरामदायक मुक्कामासाठी सर्व प्रकारे सुसज्ज असे कॅराव्हॅन पर्यटन हे केरळ पर्यटनामधील पुढची सर्वांत मोठी गोष्ट आहे. तीन दशकांपूर्वी हाऊसबोट्स ही जशी तेव्हाची‌ मोठी गोष्ट होती, तशी आजही आहे. राज्य सरकारने आधीच एक व्यापक, भागधारकांना अनुकूल असे कॅराव्हॅन पर्यटन धोरण आखले आहे व त्याला 'केराव्हॅन केरला' असे ब्रँड नाव दिले आहे व त्यामध्ये पर्यटकांना कस्टमाईझ पद्धतीने व निसर्गाच्या अतिशय जवळचा अनुभव देणारा अनुभव खात्रीने मिळणार आहे.

“केरळमधील नैसर्गिक सौंदर्य व पर्यटक अनुकूल संस्कृतीच्या सामर्थ्याच्या आधारे कॅराव्हॅन पर्यटनासाठी राज्यामध्ये प्रचंड संधी आहे. पर्यटकांना प्रसन्न करणारा अनुभव देण्याबरोबरच पर्यटकांना त्यांची संस्कृती व उत्पादने दाखवून स्थानिक समुदायांनाही लक्षणीय प्रकारे उत्पन्न मिळू शकते,” असे पर्यटन संचालक श्री. व्ही. आर. कृष्ण तेजा म्हणाले.

या धोरणामध्ये अतिथींना घरासारखा अनुभव देणाऱ्या पर्यटक कॅराव्हॅन्सना सुरक्षित, आरामदायक व स्थानिक व राज्य नियमांनुसार पूर्णत: अनुकूल मानले गेले आहे. त्यामध्ये कॅराव्हॅन पार्क्सचा विकास खाजगी, सार्वजनिक किंवा संयुक्त व्हेंचर म्हणून करण्याची तरतूद आहे. किमान 50% जमीन असलेल्या या पार्कमध्ये एका वेळी पाच कॅराव्हॅन्सना ठेवण्याची जागा व खाद्य पार्क, विश्रांती कक्ष, खेळण्याची जागा व चालकांचे निवास अशा सुविधा असाव्यात.

इंटरसाईट टूअर्स अँड ट्रॅव्हल्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री अब्राहम जॉर्ज ह्यांना वाटते की, कॅराव्हॅन्ससाठी चांगली मागणी असेल, कारण अलीकडच्या ट्रेंडसमध्ये दिसले आहे की, पर्यटक एक तर कपल्स किंवा फॅमिली म्हणून येत आहेत आणि त्यांना कमी गर्दीच्या ठिकाणी जायचे असते. ट्रॅव्हल कंपनी सध्या असे हायब्रीड पॅकेजेस बनवत आहे ज्यामध्ये कॅराव्हॅन पर्यटनाचा समावेश असेल. “हनीमूनसाठी येणाऱ्यांसाठी ते खूपच हिट ठरेल, कारण कॅराव्हॅन्समध्ये प्रायव्हसी व सुरक्षितता मोठी मिळते.”

स्पाईसलँड हॉलिडेजचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रियाज युसी ह्यांनीही आपला आनंद व्यक्त केला आणि त्यांना वाटले की, कॅराव्हॅन पर्यटन एक स्वतंत्र उत्पादन व हायब्रीड पॅकेज म्हणूनही देता येऊ शकते. “या टप्प्यावर कॅराव्हॅन पर्यटनाला सुरुवात केल्यामुळे राज्यातील पर्यटनाला अतिशय गरजेची अशी गती मिळेल, कारण अद्याप ते कोव्हिड महामारीच्या तडाख्यातून पूर्णपणे सावरलेले नाही.” खर्च कमी करण्यासाठी स्पाईसलँड हॉप- ऑन व हॉप- ऑफ मॉडेल आणण्याच्या शक्यतेवर विचार करत आहे, असेही ते म्हणाले.

यापैकी काही मोटर होम्स अतिशय आरामदायक असतात व त्या सर्व सुविधांनी सुसज्ज असतात. क्वीन साईजचे बेड्स, शॉवर आणि टॉयलेट, सौर ऊर्जेवर चालणारे गीझर्स, एअर कंडीशनर्स, हीटर्स आणि इलेक्ट्रिक व गॅस बर्नर्ससह छोटे किचन, मिनी फ्रीज, मायक्रोव्हेव्ह ओव्हन आणि स्मार्ट टेलिव्हिजन स्क्रीन्स. इथेच ही यादी संपत नाही. त्यांच्यात मोटराईज्ड खिडक्या, पोर्टेबल बार्बेक्यू ग्रिल आणि असे शेड असते ज्यामुळे आपण बाहेरच्या हवेचाही आनंद घेऊ शकता. सोफा, रेक्लायनर्स, फोल्ड होणारे टेबल्स आणि जागा वाचवण्यासाठी कन्व्हर्टीबल बेडस, मूड प्रसन्न होण्यासाठी सौम्य प्रकाश व वायफाय एनेबल असलेल्या स्मार्ट मनोरंजन सिस्टीम्समुळे तेथील वास्तव्य आणखी आनंददायक होते.

केरळमधील कॅराव्हॅन पर्यटन धोरणापासून प्रेरणा घेऊन ऑटो क्षेत्रातील दिग्गज भारत बेंझने आधीच आपल्या जागतिक दर्जाच्या व रस्त्यावर प्रवास करणाऱ्या पर्यटकासाठीच्या कॅराव्हॅनला राज्यामध्ये आणले आहे आणि बंगलूरूमधील स्टार्ट अप कँपरव्हॅन व हॉलीडेज इंडिया प्रा. लि. यांनी अलीकडेच लक्सकँपर या आपल्या प्रिमियम ट्रक- कँपरची घोषणा केली आहे.

बॅकवॉटरपासून हिल स्टेशन्सपर्यंत थक्क करणारी रमणीय दृश्ये देणाऱ्या 'गॉड्स ओन कंट्री' मधील नैसर्गिक सौंदर्य लक्षात घेता पर्यटन क्षेत्राला आमूलाग्र बदलण्याचे समार्थ्य कॅराव्हॅन्स आणि कॅराव्हॅन पार्क्समध्ये आहे. या नवीन सेग्मेंटमधील सुरुवातीची मागणी देशांतर्गत पर्यटकांपासून येईल, अशी अपेक्षा आहे व त्यांच्या मुक्कामाच्या जागी गावातील जीवनाचा अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या बाहेरच्या पर्यटकांनाही तिचे आकर्षण वाटेल. भाताच्या भरघोस पिकाने समृद्ध अशा ग्रामीण जीवनामध्ये किंवा मच्छीमारांच्या वस्तीमध्ये किंवा पारंपारिक उद्योग किंवा हस्तकलेच्या ठिकाणी त्यांना समुदायातील दैनंदिन जीवनाचे जवळून निरीक्षण करता येऊ शकते.

राज्यामध्ये जाता येणाऱ्या परंतु पर्यटकांनी न शोधलेल्या जागांचाही वापर करून त्यांनाही आकर्षक गंतव्य स्थळांमध्ये बदलण्याची शक्यता या उपक्रमामुळे निर्माण झाली आहे. त्यामुळे पर्यटन हा असा शाश्वत उपक्रम होईल ज्यामधून स्थानिक समुदायांना लाभ मिळतील व उद्योगातील संधींमध्येही मोठी भर पडेल. 

केरळमधील यशस्वी जवाबदारीसह पर्यटन (आरटी) अभियानाशी थेट प्रकारे निगडीत ह्या प्रायोगिक घटकामध्ये स्थानिक समुदाय, स्थानिक सरकारी संस्था, लघु व सूक्ष्म उद्योग, कलाकार आणि कुदुंबाश्रीसारख्या महिलांच्या सामुहिक उपक्रमांसाठी रोजगार निर्मिती व आर्थिक संधी निर्माण करण्याचे सामर्थ्य आहे.