थोडक्यात

By Admin | Updated: August 2, 2015 22:55 IST2015-08-02T22:55:09+5:302015-08-02T22:55:09+5:30

थोडक्यात

Briefly | थोडक्यात

थोडक्यात

डक्यात

तीन वर्षात फक्त एसटीत २,५00 बसची भर
मुंबई - गेल्या तीन वर्षात एसटीत बांधणी करुन आलेल्या २,५00 बसचीच भर पडली आहे. सध्या एसटीच्या ताफ्यात १८,000 बस आहेत. प्रत्येक वर्षी जवळपास दोन हजार बसची बांधणी एसटीच्या कार्यशाळेत होऊन त्या बाहेर पडल्या पाहिजेत. मात्र तसे न होता कार्यशाळेतून बाहेर पडणार्‍या बसचे प्रमाण फार कमी असल्याचे समोर आले आहे.

सीएसटी-कुर्ला ५व्या आणि ६व्या मार्गात अडचणी
मुंबई - मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर सीएसटी ते कुर्ला पाचवा आणि सहावा मार्गाचा नविन प्रकल्प केला जाणार आहे. या प्रकल्पात तांत्रिक समस्या येत असल्याने प्रकल्प पूर्ण होण्यास जवळपास एक वर्ष लागेल, अशी माहीती रेल्वेतील अधिकार्‍याकडून देण्यात आली. या कामात सॅण्डहर्स्ट रोड ते मस्जिद पर्यंत ट्रॅकच्या बाजूला असणार्‍या इमारतीही अडथळा ठरत असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Briefly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.