शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

भूतानमध्ये एन्ट्रीसाठी बदलले नियम, आता 'या' कागदपत्रांची असेल गरज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2018 12:23 IST

जर तुम्ही भूतानला फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्या कागदपत्रांची पुन्हा एकदा खात्री करुन घ्या. आता भूतानमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी नवीन नियम तयार झाला आहे.

जर तुम्ही भूतानला फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्या कागदपत्रांची पुन्हा एकदा खात्री करुन घ्या. आता भूतानमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी नवीन नियम तयार झाला आहे. आतापर्यंत भारतातून भूतानमध्ये जाण्यासाठी रेशन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्सची गरज पडत होती. पण आता नव्या नियमीनुसार वेगळ्या कागदपत्रांची गरज लागणार आहे.

जानेवारी २०१९ पासून भूतान जाणाऱ्यांकडे वोटर आयडी कार्ड किंवा पासपोर्ट असणे अनिवार्य असेल. नव्या नियमांनुसार, रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्ससारखे कागदपत्रे स्विकारली जाणार नाहीत. लहान मुलांसाठी इंग्रजीमध्ये लिहिलेला जन्माचा दाखला अनिवार्य असेल. आतापर्यंत भूतानमध्ये ज्या कागदपत्रांव्दारे एन्ट्री दिली जात होती. ते योग्य किंवा अधिकृत आहेत की नाही याबाबत संशय राहत होता. अधिकाऱ्यांना हे कळू शकत नव्हतं की, ही कागदपत्रे योग्य आहेत की नाही. त्यामुळे आता पासपोर्ट आणि वोटर आयडी कार्ड अनिवार्य केलं आहे. 

आतापर्यंत भूतानला जाणाऱ्या लोकांना सरकार द्वारे जारी करण्यात आलेल्या कागदपत्रांच्या आधारावरच एक स्लिप दिली जात होती. आता या स्लिपऐवजी पर्यटकांना एन्ट्री परमिट दिलं जाणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या परमिटवर पर्यटक केवळ पारो आणि थिंपू येथीलच प्रवास करु शकतील. तर तुम्हाला या दोन जागा सोडून इतरही ठिकाणी फिरायला जायचं असेल तर तुम्हाला स्पेशल परमिटची गरज पडेल. 

टॅग्स :Bhutanभूतानtourismपर्यटन