हिमालयाच्या पायथ्याशी वसलेलं सिक्किम हे देशातील अनेक सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. हे ठिकाण आकाराने जरी लहान असलं तरी इथे बघण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. तुम्हालाही एका भन्नाट अशा वेगळ्या ट्रिपला जायचं असेल तर तुम्ही सिक्कीममध्ये सुट्टी एन्जॉय करू शकता. सिक्कीममध्ये कुठे फिराल याचे काही खास पर्याय आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
गंगटोक
सिक्कीमची राजधानी गंगटोक हे फारच सुंदर ठिकाण आहे. उंच डोंगरांवर वसलेली सुंदर घरे इथे बघायला मिळतात. शहरात पारंपारिक रितीरिवाज आणि आधुनिक जीवनशैलीचा अनोखा संगम इथे तुम्हाल बघायला मिळतो.
युक्सोम
हे शहर सिक्कीमची पहिली राजधानी होतं. या ठिकाणाला पवित्र स्थान मानलं जातं. कारण सिक्कीमचा इतिहास या शहरापासून सुरू होतो. हेच ठिकाणा जगप्रसिद्ध कचंनजंघा पर्वताची चढाई करण्याचं बेस कॅम्प आहे. तुम्हा इथे यार्कची सवारी सुद्धा करू शकता.
सोम्गो लेक
एक किलोमीटर लांब आणि अंडाकृती सोम्यो तलाव पर्यटकांसाठी आकर्षण ठरतो. मे आणि ऑगस्ट महिन्यात हा तलाव फार सुंदर दिसतो. दुर्मिळ प्रजातीचे फूल इथे बघायला मिळतात. तसेच या तलावा वेगवेगळे पक्षी सुद्धा बघायला मिळतात. लाल पांडासाठीही हे ठिकाण फार चांगलं मानलं जातं. हिवाळ्यात या तलावाची पाणी गोठलं जातं.
नाथुला दर्रा
नाथु-ला दर्रा हे ठिकाण भारत-चीन सीमेवर स्थित आहे. याची उंची १४,२०० फूट आहे. धुक्याने झाकोळले गेलेले डोंगर, रस्ते बघण्यात इथे एक वेगळीच मजा येते. पण इथे जाण्यासाठी तुमच्याकडे परमिट असणे गरजेचे आहे.
पेलिंग
पेलिंग हे ठिकाण आता वेगाने पर्यटकांमध्ये लोकप्रिय होत आहे. ६ हजार ८०० फूट उंचीवर असलेल्या या ठिकाणावरून कंचनजंघा पर्वत जवळून बघता येतो.
रूमटेक मोनास्ट्री
सिक्कीममध्ये अनेक मठ आहेत. त्यातील हे रूमटेक मोनास्ट्री फार लोकप्रिय आहे. हा मठ येथील लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे. ग्लोडन स्तूप या मठाचा महत्त्वपूर्ण भाग आहे.
युमथंग घाट
सिक्कीमच्या युमथंग घाटाला लोक फुलांचा घाट म्हणूनही ओळखतात. कारण या घाटात दरवर्षी इंटरनॅशनल फ्लॉवर्स डे साजरा केला जातो. १ मे ते ३१ मे दरम्यान इथे फेस्टिव्हल असतो. इथे वेगवेगळ्या प्रजातींचे फूल बघायला मिळतात.