विमेन ओन्ली तिच्या सहलीच्या नियोजनाचा उत्तम पर्याय
By Admin | Updated: April 25, 2017 17:58 IST2017-04-25T17:58:52+5:302017-04-25T17:58:52+5:30
आपल्या सोयीनुसार आणि बजेटनुसार जर ट्रीप प्लॅन करायची असेल ‘विमेन ओन्ली’ ट्रॅव्हल पोर्टलचा चांगला आॅप्शन उपलब्ध आहे.

विमेन ओन्ली तिच्या सहलीच्या नियोजनाचा उत्तम पर्याय
- अमृता कदम
आपलं रोजचं रूटिन काम, मुलं, घर, नाती गोती यांसारख्या जबाबदाऱ्यातून स्वत:साठी थोडा वेळ काढावा आणि अगदी फक्त आपणच आपल्यासोबत असावं, असं अनेक गृहिणींना वाटत असतं. अगदी एकट्यानंच किंवा आपल्या खास मैत्रिणींसोबत वेळ घालवण्यासाठी मग प्रवासाचं नियोजन केलं जातं. आजकाल अनेक ट्रॅव्हल कंपन्या फक्त महिलांसाठीच्या ट्रीप अरेंज करतात. पण ट्रॅव्हल कंपनीसोबत न जाता स्वत:च्या आवडीची स्थळं निवडून, आपल्या सोयीनुसार आणि बजेटनुसार जर ट्रीप प्लॅन करायची असेल ‘विमेन ओन्ली’ ट्रॅव्हल पोर्टलचा चांगला आॅप्शन उपलब्ध आहे. केवळ मुली आणि महिलांसाठी कस्टमाइज्ड किंवा ग्रूप ट्रीप प्लॅन करण्यासाठी तुम्हाला या पोर्टलचा चांगला उपयोग होऊ शकतो.
मिस ट्रॅव्हल बी
ट्रॅव्हल बी स्वत:ला महिलांनी चालवलेली, महिलांचीच आणि महिलांसाठीच असलेली ‘प्रवासी आघाडी’ म्हणूनच संबोधते. वेगवेगळ्या वयोगटाच्या, वेगवेगळ्या पाशर््वभूमीच्या महिलांना सगळ्या धकाधकीतून फक्त आणि फक्त स्वत:साठीच वेळ मिळावा या उद्देशानं ट्रॅव्हल बीच्या ट्रीप्सचं नियोजन केलं जातं त्यामुळेच निवांतपणा, थोडं अडव्हेंचर, शॉपिंग, पर्यटनस्थळांची सांस्कृतिक पाशर््वभूमी, त्या स्थळांच ऐतिहासिक आणि भौगोलिक महत्त्व अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून ट्रॅव्हल बी तुमच्या प्रवासाचं नियोजन करते. ट्रॅव्हल बी विषयी अधिक जाणून घेण्यासाठी इथे http://www.mstravelbee.com/ क्लिक करा.
बियाँड ट्रॅव्हल
अविस्मरणीय सुटी आणि सुटीचा अनुभव देण्याचं आश्वासन देणाऱ्या बियॉँड ट्रॅव्हल केवळ पर्यटनस्थळांना भेट देऊन परत आणण्यापेक्षा अधिक काही देण्यासाठी नेहमीच प्रयत्न करतात. इथे विसरता न येणारे अनुभव आणि ते अनुभव आनंदानं उपभोगण्यासाठी साधारण सारख्याच आवडी-निवडी असलेल्या लोकांचा ग्रूप तयार करणं हे त्यांच्या प्रवासाच्या नियोजनामागचं उद्दिष्ट आहे. इथे तुम्ही खास तुमच्या स्वत:साठी खासगी किंवा कस्टमाइज्ड टूर्सही प्लॅन करु शकता. अगदी जॉर्डन, पेरु , पोर्तुगाल, इजिप्तसारखी वेगळी परदेशी पर्यटनस्थळंही बियाँड ट्रॅव्हल तुमच्यासाठी प्लॅन करु शकते. बियाँड ट्रॅव्हलची वेबसाइट पाहण्यासाठी इथे https://byond.travel क्लिक करा.
यंदाच्या सुटीमध्ये जर तुम्ही कुठे जाण्याचं ठरवलं नसेल तर या वेब पोर्टलची मदत तुम्ही नक्कीच घेऊ शकता.