शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

मान्सून सहलीचा उत्तम पर्याय : पुण्याजवळच्या देवकुंड धबधब्याविषयीची सर्व माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2019 17:28 IST

रायगड जिल्ह्यातील देवकुंड नावाचा धबधबा तरुणाईला खुणावत असतो. पुण्यापासून काही तासांच्या अंतरावर असलेला धबधबा तरुणाईच्या अकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो आहे.

पुणे : रायगड जिल्ह्यातील देवकुंड नावाचा धबधबा तरुणाईला खुणावत असतो. पुण्यापासून काही तासांच्या अंतरावर असलेला धबधबा तरुणाईच्या अकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो आहे. मात्र या धबधब्यावर जाण्यासाठी फिटनेस टिकून असणे अत्यंत गरजेचे आहे. डायनोसॉरच्या काळातील महाकाय अजगाराने टाकलेल्या काते सारखा वाटणारा धबधबा निसर्गाचा चमत्कार आहे.

नेमका कुठे आहे हा देवकुंड धबधबा ?

रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात देवकुंड नावाचा धबधबा आहे. तालुक्याच्या दक्षिणेला पाटणूस नावाची ग्रामपंचायत आहे. पाटणूस ग्रामपंचायतीच्या हद्दीत भिरा नावाचे गाव आहे. याच भिरा गावात पोहचल्यानंतर अंदाजे दीड ते दोन तासांचा ट्रेक केल्यानंतर देवकुंड धबधब्यावर पोहचता येते.त्यासाठी साधारण ८ किलोमीटर चालावे लागते. पुणे शहरातून देवकुंड धबधाब्यावर कसे जायचे ?चांदणी चौकातून अंदाजे ७० कि. मी अंतरावर भिरा परिसर आहे. चांदणी चौक - पिरंगुट - पौड - माले- मुळशी- चाचवली - वारक - निवे सारोळे - ताम्हिणी घाट परिसर उतरल्यानंतर विळे भागाड नावाचा एम.आय.डी सी. परिसर येतो. विळे भागाड येथून पाली रस्त्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरुन अंदाजे ९ कि.मी गेल्यानंतर भिरा गावात पोहचता येते.  भिरा गावात पोहचल्यानंतर काय करायचे ? ग्रामस्थांच्या वतीने गाड्यांच्या पार्कींगची व्यवस्था केली आहे.  दुचाकी वाहनासाठी पार्कींगचा दर ३० रुपये आहे. धबधब्याला भेट देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून १० रुपये प्रवेश कर घेतला जातो. त्यानंतर थोडा वेळ आराम करून गाईड किंवा वाटाड्या शोधावा. 

वाटाड्या कशासाठी हवा ?

पर्यटकांच्या गर्दीमुळे स्थानिक युवा गाईडचे काम करतात. जंगलातून वाट असल्याने गाईड घेणे गरजेचे आहे.जंगलातील वाट असल्याने चालताना जखम झाली, एखादा किडा चावला तर त्यावर गाईडकडे लागलीच नैसर्गिक उपाय असतात. काय करावे व काय करु नये याच्या सुचना गाईड वारंवार देत असतो.धबधब्यावर पोहचल्यानंतर पाण्यात किती फुट जायचे, कसे जायचे याचीही  माहिती गाईडकडे असते.   

या आहेत मुख्य सूचना :

  • देवकुंड धबधबा पाहण्यासाठी लहान मुलांना घेवून जावू नये.
  •  चार तास चालण्याची तयारी असेल तरच जाण्याचा निर्णय घ्यावा. 
  • भिरागाव ते देवकुंड धबधबा अंतर दीड ते दोन तासांचे आहे. दोन तास चालून धबधब्यावर पोहचल्यावर भुक लागते. त्यामुळे सोबत काहीतरी अन्नपदार्थ ठेवावेत. 
  • स्पोर्ट शुज अथवा पावसाळी शुज असला तरी चालेल. परंतू त्याला ग्रीप असणे गरजेचे आहे.  
टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सPuneपुणेRaigadरायगडRainपाऊस