पार्टनरसोबत फिरायला जाणं असो वा मित्रांसोबत कुठेही गेल्यावर वेगवेगळे डिस्टीनेशन बघण्यासोबतच तिथे राहण्याचं ठिकाणही महत्त्वाचं ठरतं. जास्तीत जास्त लोकांना राहण्याचं ठिकाणही वेगळं असावं अशी इच्छा असते. हॉटेलमधील नेहमीसारखी रुम करण्याऐवजी अनेकांना स्थानिक कॉटेज किंवा झोपड्यांमध्ये राहणं पसंत असतं. अनेक बीचेसवरही समुद्र किनारी सुंदर झोपड्या असतात. याने एक वेगळा अनुभव मिळतो. पण असे कॉटेज सगळीकडे नसतात. पण कुठे असतात याची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
फोगहिल्स मनाली कॉटेज, मनाली
फोगहिल्स मनाली कॉटेज पर्यटकांना एक वेगळाच अनुभव देतात. कदाचित असे कॉटेज तुम्हाला दुसरीकडे बघायला मिळत नाहीत. त्यामुळे तुमच्या एन्जॉयमेंटमध्ये अधिक भर पडते. कॉटेजच्या आजूबाजूच्या हिरव्यागार डोंगरांचा सुंदर नजारा तुम्हाला भुरळ घालतो. या कॉटेजचं इंटिरिअर करण्यासाठी जास्त लाकडांचा वापर केला जातो. तसेच आजूबाजूला कॅम्पिंगचा आनंद घेण्याचाही पर्याय असतो.
ट्रीटॉप्स कॉटेज, मनाली
मनाली हे भारतातील सर्वात लोकप्रिय ठिकाणांपैकी आहे. तुम्ही इथे तुमच्या बजेटनुसार आणि आवडीनुसार बंगलो, पेंटहाऊस, कॉर्नर हाऊस, स्टुडिओ, व्हॅली साइड आणि हिल साइड स्पेस बुक करु शकता. सोबतच डोंगरांमध्ये आधुनिक सोयी-सुविधा असलेलं लाइफही तुम्ही अनुभवू शकता.
पाटलिदून सफारी लॉज, नैनीताल
पाटलिदून सफाली लॉज उत्तराखंडमधील नॅशनल जिम कार्बेट पार्कच्या सीमेवर स्थित आहे. हे एक गाव आहे जिथे तुम्ही पूर्णपणे केवळ टूरिस्टसाठी आहे. या गावात अनेक कॉटेज आहे. त्यामुळे तुम्ही इथे शांत आणि नॅच्युरल लाइफचा आनंद घेऊ शकता. सुंदर डोंगर आणि निसर्गासोबत जगभरात आणलेल्या अॅंटीक पीस आणि सुंदर इंटिरिअरने पाटलिदुन सफाली लॉज सजलेले आहेत. इथे स्पा च्या सुविधेपासून जंगल सफारीपर्यंत सगळ्या गोष्टींचा आनंद घेऊ शकता.
सिड्ज कॉटेज, अलिबाग
सिड्ज कॉटेज हे अलिबागमधील एक लोकप्रिय ठिकाण आहे. अलिबागपासून साधारण ६ किमी अंतरावर असलेल्या नागांवमध्ये हे कॉटेज आहेत. यात तुम्हाल सर्वच आधुनिक सुविधा मिळतात. तसेच इथे मोठमोठे बंगलेही आहेत. ज्यात खाजगी लॉनची सुविधा आहे.
द इंग्लिश कॉटेज, दार्जिलिंग
इंग्लिश कॉटेज हे पार्टनरसोबत खास आणि शांत वेळ घालवण्यासाठी परफेक्ट प्लेस आहे. या कॉटेजमध्ये तुम्ही तुमच्या गरजेनुसार दोन ते चार रुम बुक करु शकता. एकदा जर तुम्ही इथे गेलात तर परत येण्याचं मन होणार नाही.