भन्नाट अनुभव देणारी केरळमधील नेरियामंगलमची ट्रिप!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2018 01:35 PM2018-12-14T13:35:24+5:302018-12-14T13:40:11+5:30

नेरियामंगलम केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यातील एक छोटसं गाव. तिरूअनंतरपुरमपासून हे ठिकाण फक्त 204 किमी अंतरावर आहे. पेरियार नदीच्या तटावर ऐटीत वसलेलं हे गाव छोटं असलं तरिही फार सुंदर आहे.

Off beat travel destination neriamangalam in kerala | भन्नाट अनुभव देणारी केरळमधील नेरियामंगलमची ट्रिप!

भन्नाट अनुभव देणारी केरळमधील नेरियामंगलमची ट्रिप!

googlenewsNext

नेरियामंगलम केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यातील एक छोटसं गाव. तिरूअनंतरपुरमपासून हे ठिकाण फक्त 204 किमी अंतरावर आहे. पेरियार नदीच्या तटावर ऐटीत वसलेलं हे गाव छोटं असलं तरिही फार सुंदर आहे. येथे केळी, अननस, नारळ, कॉफीची शेती मोठ्या प्रमाणावर करण्यात येते. येथील निसर्गसौंदर्य आणि मनमोहक वातावरण मन प्रसन्न करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. पहाटेच्या वेळी सुर्याची कोवळी किरणं ज्यावेळी ढगांच्या आडोशातून हलकेच डोकावतात हिरवी शाल पांघरलेल्या डोंगरांवर पडतात त्यावेळी ते दृश्य डोळ्यांमध्ये साठवून ठेवावसं वाटतं. तसं पाहायला गेलं तर देवाची भूमी म्हणून ओळखलं जाणारं केरळ पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो. परंतु केरळमध्येच असलेल्या नेरियामंगलमबाबत फार कमी लोकांना माहीत आहे. या गावाला 'इडुकी गेटवे' असंही म्हटलं जातं. 

या गावात गेल्यानंतर तुम्हाला रस्त्याच्या दुतर्फा दोन्ही बाजूंना झाडं आणि त्यांच्या मध्ये पारंपारिक पद्धतीने बांधलेली छोटी-छोटी घरं पाहायला मिळतील. येथील वस्त्यांमध्ये राहणारी लोकही पारंपारिक वेशभूषांमध्ये दिसून येतात. नेरियामंगलममध्ये पाऊस जास्त प्रमाणात होतो. त्यामुळे या गावाला केरळातील चेरापुंजी असंही म्हटलं जातं. 

नेरियामंगलम ब्रीजबाबत सांगायचे झालेचं तर हा ब्रीज मुन्नारला भारताच्या इतर शहरांशी जोडतो. हा ब्रीज पेरियार नदीवर बांधण्यात आला आहे. येथील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी आणखी एक ठिकाण म्हणजे अवरकुट्टी होय. हे ठिकाण जंगलाच्या मध्यावर नेचर लव्हर्स आणि ट्रेकर्ससाठी तयार करण्यात आलं आहे. त्यामुळे एकदा तरी येथील निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी येथे भेट देणं गरजेचं ठरतं. 

डोंगरांवर जंगल्याच्या रस्त्यावरून जात असताना तुम्ही ट्रेकिंग करत करत तुम्ही मनुकुलम जे मुन्नारजवळ पोहोचाल. हा रस्ता जवळपास 20 किलोमीटर लांब असून येथे तुम्ही कधीही गेलात तर हमखास गजराजाचं दर्शन घडणारचं. Inchathotty Suspension Bridge नेरियामंगलम येथील सर्वात सुंदर अट्रॅक्शन आहे. हा ब्रीज प्रसिद्ध गोल्डन गेट ब्रीजचं छोटं रूप समजलं जातं. 

येथे भेट देण्यासाठी उत्तम काळ

नेरियामंगलम हे त्या खास ठिकाणांपैकी एक आहे. जिथे वर्षातून कधीही भेट देऊ शकता. परंतु तरिही येथे पाऊस जास्त पडतो. अनेकदा पावसाळ्यामध्ये येथील रस्ते ब्लॉक होतात. त्यामुळे शक्यतो पावसाळ्यामध्ये येथे जाणं टाळा. थंडीमध्ये फिरण्यासाठी हे उत्तम डेस्टिनेशन ठरेल. कारण यावेळी पेरियार नदीच्या बांधावरील फाटकं बंद केली जातात. त्यामुळे संपूर्ण जंगलामध्ये पाणी भरतं. अशावेळी तुम्ही बोटीमध्ये फिरून संपूर्ण जंगलात फिरू शकता. 

कसे पोहोचाल नेरियामंगलमला?

येथून सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन म्हणजे आलुवा. जे 45 किलोमीटर लांब आहे. या स्टेशनवरून देशातील प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये जाण्यासाठी ट्रेन्स मिळतील. कोच्ची विमानतळावरून  51 किमी. अंतरावर तुम्ही व्यवस्थित पोहोचू शकता. येथे थांबण्यासाठी तुम्हाला प्रत्येक बजेटमध्ये हॉटेल्स आणि लॉजही उपलब्ध आहेत.  

Web Title: Off beat travel destination neriamangalam in kerala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.