पहिल्यांदाच विमान प्रवास करणार आहात का? मग या 6 सूचना नक्की वाचा. चेकिंगदरम्यान मनस्ताप होणार नाही!
By Admin | Updated: May 24, 2017 18:49 IST2017-05-24T18:49:41+5:302017-05-24T18:49:41+5:30
तुम्ही जर पहिल्यांदाच विमानप्रवास करत असाल तर तुम्हाला काय न्यायचं आणि काय नाही हे माहिती आहे ना?

पहिल्यांदाच विमान प्रवास करणार आहात का? मग या 6 सूचना नक्की वाचा. चेकिंगदरम्यान मनस्ताप होणार नाही!
- अमृता कदम
तुम्ही जर पहिल्यांदाच विमानप्रवास करत असाल तर तुमच्यासोबत ठेवायच्या सामानाचं (कॅरी आॅन लगेज) वजन किती असायला पाहिजे,? लगेजमध्ये काय सामान पॅक करायचं आणि केबिन बॅगमध्ये काय काय घेता येतं? कोणत्या गोष्टी तुम्ही विमानप्रवासादरम्यान नेऊ शकत नाही? याची थोडी माहिती असली म्हणजे विमानतळावर तपासणीदरम्यान काही अडचणी येत नाही आणि खोळंबाही होत नाही.विमानप्रवासाला निघताना काय न्यायचे आणि काय नाही? हे जर नीट माहिती असेल तर दंडाचा आर्थिक भुर्दंडही बसत नाही.