शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

जगभर : लाखो नोकरदारांना हवं ‘गावातच’ घर!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2021 8:15 AM

कोरोनाकाळात घडलेला सर्वांत मोठा बदल म्हणजे वर्क फ्रॉम होम! आपला उद्योग, काम सुरू राहावे, यासाठी जगभरातील कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा दिली. ज्यांना ज्यांना शक्य होते, त्या साऱ्यांनी याचा लाभ घेतला.

कोरोनाकाळात जगभरातील लाखो उद्योगधंदे आणि विशेषत: मजूरवर्ग देशोधडीला लागला, तरी काही वेगळ्या आणि चांगल्या गाेष्टीही कोरोनामुळे घडून आल्या. प्राप्त परिस्थितीत जगण्याचे आणि उद्योगधंदे काही प्रमाणात का होईना सुरू ठेवण्याचे नवे मार्ग कोरोनानं दाखवले. त्यामुळे जगभरात मोठा बदल घडून आला आणि येत्या काळात आता  लोकांची ती गरजही झाली आहे. कोरोनाकाळात घडलेला सर्वांत मोठा बदल म्हणजे वर्क फ्रॉम होम! आपला उद्योग, काम सुरू राहावे, यासाठी जगभरातील कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा दिली. ज्यांना ज्यांना शक्य होते, त्या साऱ्यांनी याचा लाभ घेतला.

तंत्रज्ञानाचा हा हात जर लोकांच्या मदतीला नसता तर अख्ख्या जगभर आणखी हाहाकार माजला असता. वर्क फ्रॉम होममुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या नुसत्या नोकऱ्याच टिकून राहिल्या नाहीत, तर उद्योगधंद्यांनाही आधार मिळाला. ज्या उद्योगांना असा आधार मिळाला नाही, ते जवळपास डुबले आणि कर्मचारीही बेकार झाले. कोरोनामुळे आणखी एक महत्त्वाची गोष्ट झाली, ती म्हणजे मोठ्या शहरांवरचं अवलंबित्व कमी झालं. आपली कंपनी, आपल्या कंपनीचं ऑफिस मोठ्या शहरांत, अवाढव्य आणि चकाचकच असण्याची गरज नाही, हे उद्योगांना लक्षात आलं. नोकरीसाठी आपलं घरदार सोडून मोठ्या शहरातच आलं पाहिजे यासाठीची कर्मचाऱ्यांची ओढही कमी झाली. मोठ्या शहरांवरील  ताण त्यामुळे कमी होणे आणि छोट्या शहरांना उठाव मिळणे ही नवी वाट त्यातून दिसली. तिथे घरबांधणीचा उद्योग प्रचंड प्रमाणात वाढला.

अमेरिकेत तर छोट्या शहरांतील घरबांधणीत जणू क्रांतीच झाली. छोट्या शहरांमध्ये घरांची मागणी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली. अनेक लोकांनी मोठ्या शहरांपेक्षा छोट्या शहरात राहाणं अधिक पसंत केलं. त्यात गृहकर्जाचे व्याजदरही मोठ्या प्रमाणात कमी झाले. या संधीचा फायदा सर्वसामान्य लोकांनी घेतला. त्यामुळे २००६नंतर प्रथमच छोट्या शहरांत प्रचंड मोठ्या प्रमाणात नव्या घरांचे बांधकाम सुरू आहे. त्याचवेळी मोठ्या शहरांत जागाटंचाई आणि कच्चा माल व मजुरीच्या दरात वाढ झाल्याने घरांच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या.  लॉकडाऊनमुळे आणि घरून काम करण्याच्या सुविधेमुळे ऑफिसच्या जवळ आपलं घर असलं पाहिजे ही कर्मचाऱ्यांची मानसिकता आणि गरजही बदलली. त्याचं आकर्षण कमी झालं. अमेरिकेतील ‘नॅशनल होम बिल्डर्स असोसिएशन’च्या माहितीनुसार लोकांचे पगार कमी झालेले असले, तरी छोट्या शहरांत गेल्यावर्षीच्या तुलनेत घरांची मागणी वाढली आहे.

जवळपास १५ टक्के नवीन घरं बांधली गेली आहेत, काहींचं काम सुरू असून, अल्पावधीतच ती पूर्ण होतील. मोठ्या शहरांतही गृहनिर्माण उद्योग वाढतो आहे; पण त्याचं प्रमाण कमी आहे. गृहनिर्माण क्षेत्रात २००६ नंतर प्रथमच एवढी मोठी तेजी आली आहे. २००५ मध्ये अमेरिकेत १७ लाख ‘सिंगल फॅमिली होम’ तयार झाले होते. मात्र त्यावेळी घरांची कृत्रिम टंचाई आणि गरजेपेक्षा जास्त घरबांधणी झाल्यामुळे लगेच हा फुगाही फुटला होता. गृहनिर्माण क्षेत्रच गोत्यात आलं होतं. अमेरिकन बिल्डर्सनी या वर्षात मात्र आतापर्यंत ११ लाख ‘सिंगल फॅमिली होम्स’ची निर्मिती केली आहे. येत्या काही महिन्यांत घरांची मागणी आणि बांधणी आणखी वाढेल. 

जागतिक महामंदीच्या काळात संपूर्ण गृहनिर्माण उद्योगच डबघाईला आल्यानं बिल्डरांनी ताकही फुंकून पिताना घरांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर बंद केली होती. त्याचाही फटका बसला. गव्हर्नमेंट हाऊसिंग लोन कंपनी फ्रेडी मेक यांच्या अंदाजानुसार अमेरिकेत गेल्यावर्षीच, म्हणजे २०२०च्या अखरेपर्यंत मागणीपेक्षा तब्बल ३८ लाख घरांची कमतरता होती. पहिल्यांदाच घर घेत असणाऱ्या तरुण वर्गाला त्याचा मोठा फटका बसला हाेता. इच्छा असूनही लोकांना घरं मिळत नव्हती. ती कमतरता आता यंदा भरून निघते आहे.  कोरोनामुळे छोट्या शहरांत तुलनेनं छोटी कार्यालये असण्याची गरज जगभरात मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्यामुळे लोकांचा ओढाही आता आपल्या ‘गावाकडे’, छोट्या शहरांकडे वाढला आहे. मोठमोठ्या शहरांतील मोठ्या कार्यालयांची गरज ‘वर्क फ्रॉम होम’मुळे कमी झाल्याने कंपन्यांचाही पैसा खूप मोठ्या प्रमाणात वाचतो आहे. हा वाचलेला पैसा काही कंपन्या कर्मचाऱ्यांवरही खर्च करीत आहेत. 

वीस टक्के लोकांचं घरातच ऑफिस!कोरोनामुळे जगभरातल्या आर्थिक संरचनेतच बदल झाला. कॅलिफोर्निया आणि इतर अनेक शहरांतून लोक, कर्मचारी निघून गेले होते. ज्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची सुविधा मिळालीय, त्यातील बहुतांश कर्मचारी आता पुन्हा मोठ्या शहरांत येणार नाहीत. एका नव्या अभ्यासानुसार किमान वीस टक्के कर्मचारी आता पुन्हा त्यांच्या मुख्यालयात किंवा त्या शहरात राहायला येणार नाहीत. कारण ते घरूनच काम करतील! त्यामुळे ज्या ठिकाणी ते राहतात, जिथे त्यांचं कुटुंब आहे, अशा छोट्या शहरांतील घरांची मागणी वाढते आहे. इतक्या वर्षांनी पहिल्यांदाच सुगीचे दिवस दिसत असल्याने बिल्डर लॉबीही आनंदी झाली आहे.

टॅग्स :HomeघरTravel Tipsट्रॅव्हल टिप्स