खदानीत २0 वर्षीय तरुण बुडाला

By Admin | Updated: July 12, 2015 23:56 IST2015-07-12T23:56:40+5:302015-07-12T23:56:40+5:30

खदानीत २0 वर्षीय तरुण बुडाला

The 20-year-old young man in the threshing floor | खदानीत २0 वर्षीय तरुण बुडाला

खदानीत २0 वर्षीय तरुण बुडाला

ानीत २0 वर्षीय तरुण बुडाला
दहिसर येथील घटना
मुंबई - खदानीत साचलेल्या पाण्यात पोहायला गेलेला २0 वर्षीय तरुण बुडाल्याची घटना दहिसर येथील महाराष्ट्र खदान धारखाडी येथे दुपारी घडली. या तरुणाचा शोध घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते. दुसर्‍या दिवशीही शोधमोहीम सुरु ठेवली जाईल, असे दहिसर पोलिस ठाण्याकडून सांगण्यात आले.
दहिसर रावळपाडा येथे राहणारा रवि शर्मा (२0) हा आपल्या अन्य तीन मित्रांसोबत धारखाडी येथे खदानीत पोहोण्यासाठी गेला. चौघांपैकी तीन जण खदानीत पोहोण्यासाठी उतरले. तर एक जण बाहेर बसून राहिला. पोहोत असतानाच रवि शर्मा हा बुडू लागला आणि अचानक गायब झाला. त्यावेळी त्याचे दोन मित्र खदानीबाहेर आले आणि याची माहीती परिसरातील अन्य लोकांना देतानाच पोलिसांनाही देण्यात आली. त्यानंतर रविचा शोध घेण्याचे काम करण्यात आले. मात्र तो सापडत नसल्याने नौदल कर्मचार्‍यांना बोलावण्यात आले. परंतु त्याचा शोध काही लागला नाही. रात्री उशिरापर्यंत शोध घेतल्यानंतर शोधमोहीम थांबवण्यात आली. दुसर्‍या दिवशीही शोध सुरु ठेवू, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Web Title: The 20-year-old young man in the threshing floor