पीएमपीचा १६७ कोटी तुटीचा ताळेबंद मंजुर
By Admin | Updated: August 26, 2015 23:32 IST2015-08-26T23:32:43+5:302015-08-26T23:32:43+5:30
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाचा (पीएमपी) आर्थिक वर्ष २०१४-१५ चा १६७ कोटी ६८ लाख रुपयांच्या तुटीचा ताळेबंद बुधवारी संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. या ताळेबंदावर सुमारे एक ते दीड तास चर्चा झाली. पीएमपीची वार्षिक सर्वसाधारण सभा दि. १८ सप्टेबर रोजी घेण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

पीएमपीचा १६७ कोटी तुटीचा ताळेबंद मंजुर
प णे : पुणे महानगर परिवहन महामंडळाचा (पीएमपी) आर्थिक वर्ष २०१४-१५ चा १६७ कोटी ६८ लाख रुपयांच्या तुटीचा ताळेबंद बुधवारी संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. या ताळेबंदावर सुमारे एक ते दीड तास चर्चा झाली. पीएमपीची वार्षिक सर्वसाधारण सभा दि. १८ सप्टेबर रोजी घेण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.पीएमपीला २०१४-१५ या आर्थिकवर्षात १६७.६८ कोटी रुपये तोटा झाला आहे. त्यावर बैठकीत जोरदार चर्चा झाली. पुण्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे, पिंंपरी चिंंचवडच्या महापौर सुशिला धारडे, पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अभिषेक कृष्णा, संचालक विजय देशमुख, स्थायी समितीच्या अध्यक्षा अश्विनी कदम बैठकीला उपस्थित होत्या. पीएमपीला मागील आर्थिक वर्षात झालेला तोटा, यावर्षी उत्पन्नात होत असलेली वाढ, झालेला खर्च असा सर्वंकष ताळेबंद बैठकीत मांडण्यात आला. त्या प्रत्येक मुद्यावर चर्चा करण्यात आली. मागील वर्षी तोटा झाला असला तरी सध्या होत असलेल्या सुधारणांमुळे उत्पन्नात वाढ होत आहे. त्यामुळे या आर्थिक वर्षात तोटा कमी होईल, अशी अपेक्षा कृष्णा यांनी व्यक्त केली. तसेच दोन्ही पालिकांना ही संचलन तुट देण्याची मागणीही करण्यात आली. राज्य शासनाने संचलन तुट भरून देण्याचे आदेश यापुर्वीच दिले आहेत. त्यामुळे दोन्ही पालिकांना ही तुट भरून द्यावी लागणार आहे. दरम्यान, पीएमपीची वार्षिक सर्वसाधारण सभा दि. १८ सप्टेबर रोजी घेण्यात येणार आहे. बैठकीत यावरही चर्चा करण्यात आली. त्यानुसार सभेचा दिवस निश्चित करण्यात आला आहे.-----------