भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. Read More
जागतिक पातळीवर ‘हॅशटॅग मी टू’ ही चळवळ सुरू झाली आणि बऱ्याच महिलांनी त्यांच्यासोबत होणाऱ्या हिंसाचाराला जगासमोर मांडले. आपल्या नागपुरातही घरगुती हिंसेच्या २३०३ तक्रारींची नोंद झाली आहे. ...
विद्युत खांबावर चढून लाईन दुरुस्त करणारे तंत्रज्ञ विद्युत सहायक पाहिले तरी अंगावर काटा उभा राहतो. केवळ पुरुषांची मक्तेदारी असलेल्या या कामाला एका महिलेने आव्हान म्हणून स्वीकारले आणि आयुष्याची एक वेगळी वाट निवडली. अरुणा वाटकर असे या तरुण महिलेचे नाव. ...
जीवन क्षणाक्षणाला परीक्षा घेते. अशीच परिस्थिती वीरपत्नी सविता धोपाडे यांच्यावर ओढवली, पण त्यावेळी त्यांनी खचून न जाता आत्मबळ उंचावून जबाबदाऱ्यांचा डोंगर पेलला. ...
मागील वर्षभराच्या कालावधीत तिने २७ दारू तस्करांसह प्रवाशांचे साहित्य पळविणाऱ्या अन् गांजाची तस्करी करणाऱ्या आरोपींचा बंदोबस्त करून त्यांच्या नाकीनऊ आणले आहे. उषा तिग्गा असे या आरपीएफमधील ‘डॅशिंग लेडी’चे नाव आहे. ...
विविध उपक्रम राबवून गृहिणींच्या आर्थिक सक्षमीकरणाची जबाबदारी स्वीकारायला द धरमपेठ मल्टीस्टेट को-आॅपरेटिव्ह सोसायटीच्या संस्थापक अध्यक्षा नीलिमा बावणे यांनी पुढाकार घेतला. ...