व्हॉट्सॲप हा सध्या आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. केवळ व्हॉट्सॲप वरून सर्वांशी संपर्कात राहता येत असल्याने युवकांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आलेत. ‘व्हॉट्सॲप लव’ सिनेमाचा नुकताच पहिला टीजर मोशन पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. पोस्टर आणि शीर्षक पाहून सिनेमाचा प्रकार जुजबी लक्षात येत असल्याने, विषयाबाबत सर्वच वयोगटातील स्त्री-पुरूष व्हॉट्सॲप युजर्समध्ये जास्तच उत्सुकता निर्माण झाली आहे. संगीतरजनींचे आयोजक हेमंतकुमार महाले यांची कथा, निर्मिती आणि दिग्दर्शित असलेला एच.एम.जी. प्रस्तुत ‘व्हॉट्सॲप लव’ 5 एप्रिल रोजी सर्वांच्या भेटीला येणार आहे. Read More