West Bengal Assembly Elections 2021 Latest NewsFOLLOW
West bengal assembly elections 2021, Latest Marathi News
देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानुसार, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक आठ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. पहिला टप्पा - 27 मार्च रोजी मतदान, दुसरा टप्पा - 1 एप्रिल, तिसरा टप्पा - 6 एप्रिल, चौथा टप्पा - 10 एप्रिल, पाचवा टप्पा - 17 एप्रिल, सहावा टप्पा- 26 एप्रिल, सातवा टप्पा- २६ एप्रिल, आठवा टप्पा- २९ एप्रिल मतदान होईल. त्यानंतर, 2 मे रोजी निकाल जाहीर होईल. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत Read More
West Bengal Assembly Elections 2021 Mamata Banerjee And BJP : ममता बॅनर्जी या नंदीग्राममधून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात भाजपचे विद्यमान आमदार शुभेंद्रू अधिकारी लढत आहेत. प्रलय पाल यांनी हा गौप्यस्फोट करून खळबळ उडवून दिली आहे. ...
पश्चिम बंगालमध्ये आज पहिल्या टप्प्यातील मतदान होत असतानाच पंतप्रधान मोदींनी मतुआ समाजाच्या मंदिरात पूजा केली. पश्चिम बंगालमध्ये मतुआ समाजाची संख्या जवळपास 2 कोटी एवढी आहे. हा समाज पश्चिम बंगालमधील मतांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. ...
पंतप्रधान मोदी मंदिर परिसरात येताच शंख वाजवून आणि गंध लावून त्यांचे स्वाग करण्यात आले. यावेळी त्यांनी देवीला एक मुकूट, साडी आणि इतर काही पूजेचे साहित्य अर्पण केले. 'जेशोरेश्वरी काली मंदिरात पूजा करून आपण धन्य झालो' असे मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटल ...
सौमेंदू यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यात कारचालक जखमी झाला आहे. सुवेंदू अधिकारी यांचे भाऊ दिब्येंदू अधकारी यांनी आपल्या भावाच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यासाठी टीएमसी नेत्यावर आरोप केला आहे. (West assembly election) ...
West Bengal Assembly Elections 2021 : केशियारीमध्ये भाजपा कार्यकर्ता मंगल सोरेनचा मृतदेह आढळला आहे. या कार्यकर्त्याला मारहाण करून त्याची हत्या करण्यात आल्याचा दावा भाजपाने केला आहे. ...
पहिल्या टप्प्यात पुरुलिया व झारग्राम येथील सर्व मतदारसंघ तसेच बांकुरा, पूर्व मेदिनीपूर व पश्चिम मेदिनीपूरमधील काही मतदारसंघांचा समावेश आहे. सर्व पक्ष व अपक्षांचे मिळून एकूण 191 उमेदवार रिंगणात आहेत. (West Bengal Election) ...