बीड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राहिलेले वाल्मीक कराड हे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे कराड चर्चेत असून त्यांच्यावर पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.