तीन महिन्यापासून लोकांना वीज बिल आले नाही. आता तीन महिन्याचे बिल एकाचवेळी पाठवण्यात आले. ते सरासरीपेक्षा कैकपटीने अधिक आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. अव्वाच्या सव्वा वाढीव बिल आल्याने यात कपात करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष आ. ...
सीबीएसई तसेच खासगी शाळांतील लॉकडाऊनच्या कालावधीतील शुल्क माफ करण्यात यावे. तसेच पुढील शैक्षणिक सत्रातील शुल्कात ५० टक्क्याची सूट देण्यात यावी, अशी मागणी आ.विकास ठाकरे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविले आहे. ...
पश्चिम नागपुरातील धरमपेठ झोन क्षेत्रातील ट्रस्ट ले-आऊट क्षेत्र कंटेन्मेंट घोषित करण्यात आल्याने मागील १६ दिवसांपासून नागरिक आपल्या घरात बंदिस्त आहेत. गरीब लोकांची उपासमार सुरू आहे. या क्षेत्रातील लोकांना जेवण व जीवनावश्यक सेवा उपलब्ध करण्यासंदर्भात म ...
शहरात आपला जनसंपर्क वाढवण्याच्या उद्देशाने काँग्रेसने दर शनिवारी जनता दरबार आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. याप्रकारच्या पहिल्या जनता दरबारात मनपाशी संबंधित मुद्दे विशेषत्वाने दिसून आले. ...
मैत्रेय उद्योग परिवार (समूह ) मुंबई या कंपनीने नागपुरात कार्यालय उघडून नागरिकांना मोठमोठे आमिष देऊन ग्राहकांच्या ठेवी स्वीकारल्या. त्यानंतर फेब्रुवारी २०१६ मध्ये कंपनी अचानक बंद करून ग्राहकांची फसवणूक केली. ...
सिमेंट रोडच्या उंचीमुळे दुकानांमध्ये तसेच वस्त्यांमध्ये पावसाचे पाणी साचण्याची शक्यता विचारात घेता पुढील काम करताना आधी एक फूट रस्ता खोदा व नंतर त्यावर सिमेंट रोडचे बांधकाम करा, अशी सूचना आ.विकास ठाकरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना ...
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशाची सेवा केली. त्यांनी देशासाठी केलेल्या त्यागापासून युवकांनी प्रेरणा घ्यावी, असे आवाहन शहर काँग्रेसचे अध्यक्ष व आमदार विकास ठाकरे यांनी सोमवारी केले. ...