पोलिसांनी गुरुवारपासून महत्वाच्या चौकात असलेली प्रतिष्ठाने, दुकानातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे. त्यामुळे पोलिसांच्या नजरेतून सुटलेले उपद्रवी, आंदोलकांना सीसीटीव्ही फुटेजचा माध्यमातून जेरबंद करण्यात येणार आहे. ...
आज (१९ नोव्हेंबर) दुपारी ३ वाजता इंटरनेट बंदीचा आढावा घेतला जाणार आहे. यादरम्यान माजी मंत्री जगदीश गुप्ता व निषाद जोध यांना १५ दिवस शहराबाहेर राहण्याचे आदेश स्थानिक न्यायालयाने बुधवारी सायंकाळी दिले. ...
पोलिसांनी गृह मंत्रालयाला सादर केलेल्या अहवालात काही मुस्लिम संघटना आणि राजकीय पक्षांशी संबंधित लोकांची भूमिका संशयास्पद असल्याचे सांगण्यात आले आहे. ...
शहराची परिस्थिती पाहून तो निर्णय स्थानिक स्तरावर घेण्यात येईल, अशी माहिती राज्याचे अपर पोलीस महासंचालक राजेंदर सिंग यांनी दिली आहे. मात्र, तोपर्यंत संचारबंदीत रोज २ ते ३ तास अशी शिथिलता देण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले. ...
धार्मिक सौहार्द राखत दोन्ही समाजाती सुजाण मंडळींनी मानवतेची शान कायम ठेवली आहे. मुस्लीमबहुल भागातील चार मंदिरांची सुरक्षा मुस्लीम बांधव करीत आहेत. तर, हिंदुबहुल भागातील मशिदींचे संरक्षण हिंदू बांधव करीत आहेत. ...
कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी आपण अमरावती दौरा रद्द करावा असे अमरावती पोलिसांनी सोमैया यांना म्हटले आहे. परंतु, सोमैया मात्र अमरावती दौऱ्यावर ठाम असल्याचे दिसत आहे. ...