रस्त्यावरील खड्डे तत्काळ बुजविण्यासाठी आता ठाणे महापालिकेने प्रतीसाद कालावधी कमी केला आहे. त्यामुळे ठाणेकरांनी एखाद्या खड्याची तक्रार केली तर अवघ्या दोन तासाच्याच आता खड्डा बुजविण्यात येऊन तेथून वाहतुकसुध्दा सुरु होईल असा दावा पालिकेने केला आहे. ...
प्रधानमंत्री आवास योजना ठाणे महापालिकेमार्फत राबविण्याचा विचार सुरु आहे. परंतु यातील अटी आणि शर्ती पाहता, ठाण्यात ही योजना राबविणे आता अशक्य होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे महापालिकेने आता गावठाण आणि कोळीवाड्यांना साद घालण्याचा निर्णय घ ...
राज्य शासनाच्या आदेशानुसार ठाणे महापालिकेने नव्याने शांतता क्षेत्र घोषीत केले आहेत. त्यानुसार शहरातील २६ ठिकाणे हे शांतता क्षेत्र म्हणून यापुढे ओळखले जाणार आहेत. यामध्ये बहुसंख्य शाळांच्या ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे. ...
देशभरात नावाजलेल्या ‘अक्षयपात्र’ या सामाजिक संस्थेमार्फत ठाणे महापालिकेच्या २६ शाळांमधील पाच हजार ८६६ विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन पुरवले जाते. सकस ताज्या जेवणामुळे विद्यार्थ्यांना शाळेचा लळा लागल्याचे शिक्षक सांगतात. ...
शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी आता पालिका रेन कॉंक्रीटचा वापर करणार आहे. यासाठी वाढीव ६० लाखांची तरतूदही केली जाणार आहे. परंतु हे नवीन तंत्रज्ञान कितपत फायदेशीर ठरणार हे आता येणाऱ्या काही दिवसातच स्पष्ट होणार आहे. ...
ठाणे महापालिकेत सलग ३८ वर्षे सेवा करणारे मुख्य सुरक्षा अधिकारी शुक्राम जाधव हे मंगळवारी सेवा निवृत्त झाले. महापौरांच्या उपस्थितीत त्यांचा निरोप समारंभ साजरा झाला. ...
ठाणे महापालिकेकडून प्रतीदिन तब्बल ४९ दशलक्ष लीटर पाण्याची नासाडी होत असल्याची माहिती समोर आली आहे. ही नासाडी टाळण्यासाठी पालिका आता काय उपाय योजना करणार हे पाहणे महत्वाचे ठरले आहे. ...
ठाण्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेता येथे १४ फायर स्टेशनची आवश्यकता आहे. त्यानुसार आता नव्याने तीन फायर स्टेशन येत्या काळात कार्यान्वित होणार आहेत. या संदर्भातील प्रस्तावांना नुकतीच मान्यता मिळाली असून पावसाळ्यानंतर केंद्राच्या कामांना सुरवात होणार आ ...