पिंपळगाव बसवंत : गाव, शहर, मंदिर, रस्ते, स्मशानभूमी, गल्ली स्वच्छ करण्यासाठी जय बाबाजी भक्त परिवाराने पुढाकार घेतला असून त्यासाठी १ कोटी २५ लाख ३४ हजार ५६७ तास श्रमदान केले जाणार असल्याची माहिती परिवारामार्फत देण्यात आली. ...
लोहोणेर : धाराशिव संचलित वसाका या कारखान्याच्या ३६ व्या गाळप हंगामाची बुधवारी (दि. ३०) सांगता झाली. या गाळप हंगामात २ लाख २ हजार ५०० मे. टन उसाचे गाळप करण्यात आले. त्यातून १ लाख ९४ हजार क्विंटल साखरनिर्मिती होऊन सरासरी साखर उतारा ९.६० टक्के मिळाला. ...
साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा येथील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या बाळनाथ महाराज यात्रेनिमित्त शेवटच्या दिवशी कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात येऊन यात्रेची सांगता झाली. ...
ठाणगाव : सोनांबे विकास सोसायटीची निवडणूक होऊन जनसेवा पॅनलने बारा जागा जिंकून निर्वाचित वर्चस्व स्थापित केले. तर विरोधी समर्थ पॅनलला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले तर एक जागा यापूर्वीच बिनविरोध निवडण्यात आली होती. ...
देवळा : तालुक्यातील वाजगाव, खुंटेवाडी, वाखारवाडी व डोंगरगाव ह्या चार विविध कार्यकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी १४५ अर्ज दाखल झाले असून, वाजगाव सोसायटीसाठी सर्वाधिक ५१ उमेदवारी अर्ज दाखल ...
नाशिक : जिल्ह्यातील बागलाण, दिंडोरी, पेठसह काही भागांत सोमवारी (दि.७) सायंकाळी बेमोसमी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली, तर कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अंबासन येथे वीज कोसळून बैल ...
मनमाड : शहर परिसरात कोरोनाचे रुग्ण कमी होताच आता मास्क घालणे काही नागरिकांनी जवळपास बंदच केले असल्याचे दिसून येत आहे. केवळ १० टक्केच नागरिक मास्क घालत असल्याचे दिसून येते. प्रशासनाने बरीच जागृती केल्यानंतर नागरिकांनी मास्क घालण्यास सुरुवात केली होती. ...