पुरातत्त्व विभागाने योग्य प्रकारे काम केले असते तर ही वेळ आलीच नसती. पुरातत्त्व विभाग ज्या पद्धतीने स्वतःचा बचाव करत आहे हे अत्यंत धक्कादायक आहे. अशा शब्दांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ...
ऐतिहासिक वारसा असलेल्या ताजमहालाच्या रंगात झालेल्या बदलाविषयी सर्वाेच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. यापूर्वी या वास्तूचा रंग पिवळसर झाला होता. ...
खंडपीठासमोर याचिकाकर्ते एम. सी मेहता यांनी दिलेले ताजमहालाचे फोटो सादर करण्यात आले त्यानंतर न्यायाधीशांनी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एएनएस नाडकर्णी यांना पुर्वी ताजमहाल पिवळा दिसत होता आता तो तपकिरी आणि हिरवा दिसू लागल्याचे निरीक्षण सांगितले. ...
ताजमहालकडे एक कलाकृती म्हणून बघितले गेले पाहिजे. जगभरात प्रेमाचे प्रतीक म्हणून तो ओळखला जातो. त्याची ही ओळख कायम ठेवण्याची जबाबदारी भारतीयांची आहे. आपल्या क्षुल्लक स्वार्थासाठी त्याला ‘द्वेषाचे प्रतीक’ बनविण्याचा प्रयत्न कुणी करू नये. ...