शेवगाव तालुक्यातील राणेगाव येथे एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. त्याच्या संपर्कातील दहा जणांना तपासणीसाठी नगरला हलविले आहे, अशी माहिती शेवगावचे नायब तहसीलदार मयूर बेरड यांनी दिली. ...
शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी येथील विलगीकरण कक्षातील ६० वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह निघाली आहे. तिचा संपर्कातील त्यांचा मुलगा-सून व दोन नातवंडे अशा चार जणांना रात्री उशीरा तपासणीसाठी नगरच्या सरकारी रुग्णालयात पाठविले आहे, अशी माहिती दहिगावने प्राथमिक आरोग ...
यंदा हंगाम सुरू करण्याच्या मुहूर्तावरच कोरोनाचे संकट ओढावल्याने शहरांसह ग्रामीण भागातील सर्वच उद्योगधंदे बंद करण्यात आले. सद्यस्थितीला चौथ्या लॉकडाऊनमध्येही हॉटेल, शीतपेय व रसवंतीगृहाला परवानगी नसल्याने दोन महिन्यांपासून ठप्प असलेला रसवंतीचा गाडा न फ ...
चौथ्या लॉकडाऊनमध्ये जिल्ह्याचा समावेश ‘नॉन रेड’ झोनमध्ये झाल्याने शहरांसह ग्रामीण भागातील बहुतांश उद्योग व दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील दाढी, कटींग करणाºया सलून व्यवसायालाही परवानगी मिळाल्याने अनेकांच्या डोक्यावरील ...
लॉकडाऊनमधून सरकारने शिथीलता देतांना राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या बसेसला जिल्ह्यातर्गंत प्रवासी वाहतूक करण्यास मुभा दिली आहे. मंडळाने सर्व गाड्या सज्ज करताना सॅनिटाईझ करुन प्रवाशांच्या वाहतुकीसाठी बसस्थानकात आणून उभ्या केल्या. मात्र प्रवाशांच्या प्रती ...
शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील सुकळी शिवारात रहात असलेले शेतकरी सुलेमान रसूल शेख यांच्या पत्र्याच्या शेडमधील बांधून ठेवलेल्या पाच शेळ्यांचा लांडग्यांनी मंगळवारी (दि.५मे) पहाटेच्या सुमारास फडशा पाडला. यामुळे शेतकरी वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे. ...
जिल्हा पुरवठा अधिका-यांनी शहरातील पाच स्वस्त धान्य दुकानात अचानक छापा टाकून तपासणी केली. या दुकानांमध्ये शिल्लक साठ्यामध्ये तफावत आढळून आली. याप्रकरणी संबंधित दुकानदारांवर शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. ...
शेवगाव तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळेतील गुरुजींनी सोशल मिडियाच्या माध्यमातून कोरोनाविषयक जनजागृतीचे धडे देण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. या माध्यमातून ३० हजार विद्यार्थी जोडले गेले आहेत. ...