आदिवासी सेवा मंडळाच्या शहापूर तालुक्यातील गोटेघर वाफे आश्रमशाळा येथे साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या अर्थसहाय्यातून बांधण्यात आलेल्या दोन वसतीगृह इमारतींच्या तसेच भोजन कक्षाला भेट देऊन त्यांची राज्यपालांनी पाहणी केली. त्याप्रसंगी ते बोलत होते. ...
राज्यपाल दौऱ्यावर येत असल्याची चर्चा मागील आठवड्यापासून सुरू आहे. आदिवासी विकास विभागाची अनुदानीत मुलींची आश्रमशाळा वाफे येथे आहे. तेथील सुमारे एक लाख १६ हजार ७१७ चौरस फूटाच्या प्रांगणात बांधलेल्या या वसतीगृहाचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते ...
किन्हवली तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागात १५ ते २० दिवसांपासून पावसाने दडी मारून उघडीप दिली असून कडक उन्हामुळे जोमाने वाढलेली भातपिके तडकली असून शेतकरी धास्तावला आहे. ...
दोन महिन्यांपूर्वी दागदागिन्यांसह सुमारे १२ लाखांचा डल्ला मारून फरार झालेल्या नेपाळी दाम्पत्यासह चौघांचा शोध घेऊन त्यांना नेपाळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात शहापूर पोलिसांना यश आले आहे. ...