सयाजी शिंदे हे भारतीय सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत.त्यांनी मराठी चित्रपट व नाटके, तसेच कन्नड, तमिळ, मल्याळम, तेलुगू आणि हिंदी भाषेतील अनेक चित्रपटात अभिनय केला आहे. यासोबतच पर्यावरण रक्षणार्थ त्यांचे भरीव योगदान असून त्यांनी सह्याद्री देवराई या संस्थेमार्फत वृक्षा रोपणाचे अभियान सुरु केले आहे. तसेच त्यांनी वृक्ष संमेलनाची संकल्पना मांडली असून पहिले वृक्ष संमेलन बीड जिल्ह्यात घेण्यात येणार आहे. Read More
झाडांचे वाढदिवस साजरे व्हायला हवेत व प्रत्येक गाव, तालुक्यातील सर्वात जुनी झाडे हेच त्या त्या भागातील आपले सेलिब्रेटी आहेत, असे मत अभिनेते आणि सह्याद्री वनराई वृक्षचळवळीचे प्रणेते सयाजी शिंदे यांनी बुधवारी व्यक्त केले. ...
महापालिकेच्यावतीने देवराई प्रकल्पांतर्गत सिडको भागातील कर्मयोगीनगर भागात गेल्या वर्षभरापूर्वी वृक्षारोपण केले होते. परंतु आज मीतिला या देवराई प्रकल्पाच्या परिसरात संपूर्ण कचऱ्याचे ढीग साचलले असून पाणीपुरवठ्याची सोय नसल्याने अनेक झाडांना फटका बसला आहे ...
अभिनेते सयाजी शिंदे आणि कथा लेखक अरविंद जगताप यांच्या सह्याद्री देवराईने आता लुप्तप्राय झालेल्या देशी आंब्यांच्या विविध प्रजाती गोळा करून त्या लावण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. ...
नाशिक - बेलासारख्या औषधी वनस्पतीची अधिकाधिक लागवड व्हावी यासाठी महानगरपालिकेच्या वतीने महाशिवरात्रीचे औचित्य साधून आजपासून बेल महोत्सवात राबविण्यास प्रारंभ झाला असून पुष्प प्रदर्शनात भेट देणाऱ्यांना बेलाची रोपे वाटप करण्यात आली. ...