समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले. समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे. Read More
कॉर्डिलिया क्रूझ प्रकरणामध्ये किरण गोसावी या पंचाने एक पंचनामा हाताने लिहिला आहे तर दुसरा टाइप केलेला आहे, अशी विसंगती का, असा प्रश्न त्यावेळी उपस्थित झाला होता. ...