१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. Read More
ठाण्यातील ‘क्लासिक मोटार डेकोर’ या मोटारींच्या असेसरीजची (सुट्या भागांची) विक्री करणाऱ्या दुकानाचे मालक मनसुख हिरेन यांचा ५ मार्च रोजी मुंब्रा रेतीबंदर भागात संशयास्पद मृत्यू झाला. त्यानंतर हिरेन कुटुंबीयांकडून सातत्याने सचिन वाझे यांच्यावर संशय व्यक ...
२५ फेब्रुवारीला उद्योगपती मुकेश अंबानींच्या घरापासून ५०० मीटरवर आढळलेल्या स्फोटक कार प्रकरणाचा तपास वाझेंकडे सोपविला होता. सुमारे ८ दिवस तेच तपास अधिकारी होते. त्यानंतर एसीपी नितीन अलकनुरे यांना नेमण्यात आले. तरीही सर्व सुत्रे वाझेच हाताळत होते. ...
२५ फेब्रुवारीला पेडर रोड परिसरात सापडलेल्या या कार ठेवण्याच्या कृत्याची ‘जैश उल हिंद’ नावाच्या संघटनेने जबाबदारी स्वीकारली होती. मात्र, चौकशीत ते खोटे असल्याचे स्पष्ट झाले. त्याबाबत मुंबई पोलिसांनी एका खासगी सायबर कंपनीचे साहाय्य घेतले होते. ...
अंबानी यांच्या घरापासून ५०० मीटर अंतरावर ही मोटार सापडली होती. त्यामध्ये जिलेटीनच्या कांड्या ठेवल्या होत्या. केवळ कांड्या ठेवल्याने स्फोट होत नाही. मात्र, सोबत अंबानी पती-पत्नीच्या नावे लिहिलेले धमकीचे पत्र होते. ...
या प्रकरणाच्या चौकशीसाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने वाझे यांना शनिवारी सकाळी ११ वाजता पेडर रोड येथील कार्यालयात बोलावले होते. सुमारे १३ तास चौकशी केल्यानंतर रात्री ११.५० वाजता त्यांना अटक करण्यात आली. ...