१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. Read More
Sachin Vaze Arrested by NIA: सचिन वाझे यांना शनिवारी 11.30 च्या सुमारास एनआयएन अटक केली होती. सुमारे 12 तास त्यांची चौकशी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. तसेच स्कॉर्पिओमध्ये स्फोटके ठेवल्यानंतर चालकाने मुंबई पोलिसांच्याच क्राईम ब्रांचच्या इनोव ...
नारायण राणे यांनी पत्रकारपरिषद घेऊन सचिन वाझे प्रकरणावरून शिवसेनेवर आरोप केले. तीन दिवसांपूर्वीच गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठवून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. ...
फडणवीस म्हणाले, वाझे यांना वाचविण्यासाठी ‘ते काय ओसामा बिन लादेन आहेत की काय?’ अशी विधाने केली गेली. परंतु, हे प्रकरण गंभीर असल्याने त्याच्या मुळाशी जाणे गरजेचे होते. ...
२५ फेब्रुवारीला उद्योगपती मुकेश अंबानींच्या घरापासून ५०० मीटरवर आढळलेल्या स्फोटक कार प्रकरणाचा तपास वाझेंकडे सोपविला होता. सुमारे ८ दिवस तेच तपास अधिकारी होते. त्यानंतर एसीपी नितीन अलकनुरे यांना नेमण्यात आले. तरीही सर्व सुत्रे वाझेच हाताळत होते. ...