१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. Read More
एखादा मुख्य आरोपीच माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज करीत असेल, तर त्याला त्या गुन्ह्यातून माफी मिळणे दुरापास्त आहे, असे मत राज्याचे सुप्रसिद्ध विधीज्ज्ञ आणि विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी मांडले. ...
काही महिन्यापुर्वी महाराष्ट्रात सर्वात जास्त चर्चा होती ती सचिन वाझे या नावाची.. कारण त्या व्यक्तीने फिल्मी स्टाईलने जे काही केलं ते धक्कादायक होतं. सचिन वाझेमुळे पोलीस आयुक्तही पदावरुन गेले आणि गृहमंत्रीसुद्धा.. त्यावेळी बऱ्याच काही घडामोडी घडल्या. ...
सेवेत रुजू झाल्यावर मला समजले की, काही ज्येष्ठ राजकीय नेते मला पुन्हा सेवेत ठेवल्याबद्दल खुश नव्हते. माझे पुन्हा निलंबन करण्यासाठी परमबीर सिंह यांना फोन येत होते. दुसऱ्याच दिवशी देशमुख यांचा मला कॉल आला आणि मला सेवेत कायम ठेवण्यासाठी त्यांनी दोन कोटी ...