१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. Read More
मुंबईतील ॲंटालिया इमारतीजवळ सापडलेल्या स्फोटकांच्या तपासात राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्याकडून वेगवेगळी माहिती मिळत असताना याच प्रकरणात बुधवारी सायंकाळी राज्य सरकारने मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग या ...
हेमंत नगराळे यांनी बुधवारी सायंकाळी मुंबई पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. ते मुंबईचे ७५ वे पाेलीस आयुक्त आहेत. या वेळी नगराळे यांच्या स्वागतासाठी सर्व सहआयुक्त, अप्पर पोलीस आयुक्त विशेष शाखा पोलीस आयुक्त कार्यालयात हजर होते. ...
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या कारचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) सुरू आहे. या स्कॉर्पिओ कारचे मालक मनसुख यांचा मृतदेह ठाण्यातल्या रेतीबंदर परिसरात संशयास्पद स्थितीत आढळून आला. ...
ज्या ठिकाणी पुरावे नष्ट केले, त्या जागेची त्यांच्या उपस्थितीत पाहणी केली. ठाण्याच्या घरी जाऊन माहिती घेतली. दरम्यान, वाझेंकडे या प्रकरणाचा तपास का देण्यात आला होता, यासाठी मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लवकरच चौकशी केली जाणार असल्याचे सूत्रा ...
महासंचालक पदावरून मुंबई पोलीस आयुक्तपदी निवड होण्याची ही पहिलीच घटना आहे. नगराळेंकडे डीजीपीचा तात्पुरता पदभार असला तरी यूपीएससी निवड समितीच्या शिक्कामोर्तबानंतर त्यांच्याकडे पद राहणार होते. ...
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी महाविकास आघाडी सरकारवर केलेल्या टीकेला शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ...
Sachin Vaze : या टीममध्ये एक महिला अधिकारी देखील आहे. तसेच आज सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास NIA ची दुसरी टीम वाझेंना मुंबईतुन ठाण्यातील साकेत कॉम्प्लेक्समध्ये पोहचले. ...