१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. Read More
सचिन वाझे प्रकरणावरुन सोमवारी महाविकास आघाडीतील घडामोडींनाही वेग आला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी एक तास चर्चा केली. ...
ते म्हणाले, राज्याच्या पोलीस यंत्रणेत अनेक चांगले अधिकारी आहेत. ते अनेक किचकट प्रकरणांचा चांगला तपास करीत आहेत; परंतु त्यानंतरही केंद्राने या प्रकरणात हस्तक्षेप केला. ...
मुंबईत सापडलेली स्फोटके ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन यांच्या ताब्यातील स्कॉर्पिओत ठेवली होती. या कारसोबत असलेली इनोव्हा एनआयएने मुंबई पोलिसांच्या वाहनांची देखभाल ठेवली जाते, त्या विभागातून रविवारी ताब्यात घेतली. ...
स्कॉर्पिओवरील हाताचे ठसे परीक्षणासाठी पाठवले होते. यामध्ये गाडीवर सचिन वाझे यांच्या हाताचेही ठसे असल्याचे निष्पन्न झाले. त्याचप्रमाणे २५ फेब्रुवारीला गाडी आढळून आली, त्याचदिवशी वाझे व मनसुख हिरेन यांची भेट झाली होती. ...
आमच्या दुकानात तयार होणाऱ्या प्रत्येक कारच्या नंबरप्लेटवर आयएनडी असा उल्लेख असतो असे त्यांनी सांगितले. तसेच आमच्याकडे बनवली नंबरप्लेट ॲक्रेलिकने बनवलेली असते. ...
वाझे यांना न्यायालयात हजर करावे आणि त्यांची सुटका करावी, अशी मागणी सुधर्म यांनी याचिकेद्वारे केली. मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला यांना हाताशी धरून आणि त्यांचा वापर करून राजकीय क्षेत्रातील काही नेत्यांनी सचिन वाझे यांना बळीचा बकरा केला आहे. ...
मल्टिबिल्ड इन्फ्रा प्रोजेक्टस् लिमिटेड आणि टेकलिगल सोल्युशन्स प्रा. लिमिटेड या दोन कंपन्या बंद असून, केवळ डिजिनेक्स्ट मल्टिमीडिया लिमिटेड ही एकच कंपनी सुरू असल्याचे कंपनी व्यवहार मंत्रालयाच्या नोंदीवरून दिसत आहे. ...