१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. Read More
मुंबई क्राइम ब्रँचच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सोमवारी रात्रीपासून मंगळवारी पहाटे चार वाजेपर्यंत आठ तास ही कारवाई सुरू होती. स्फाेटकांनी भरलेली स्काॅर्पिओ वाझेनीच पार्क केल्याचे एनआयएच्या तपासातून समोर आले आहे. ...
गाडी पार्क करणे, इनोव्हाची नंबर प्लेट बदलणे, ठाण्यातील वाझे यांचे निवासस्थान व नंबरप्लेट बनविलेल्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज गायब करणे, याबद्दल त्यांच्याकडे चाैकशी करण्यात येत आहे. ...
येत्या दोन - तीन दिवसांत एनआयएकडून या गुन्ह्याबाबत तपासाअंती मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मुंबई पोलीस दलात फेरबदल करण्यात येतील, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. ...
वाझे यांना अटक केल्यानंतर २४ तासांत न्यायालयात हजर केले नाही. प्रत्यक्षात त्यांना २४ तासांत न्यायालयात हजर करणे गरजेचे हाेते. तसेच त्यांना अटक करण्यापूर्वी सीआरपीसी ४५ (१) अंतर्गत सरकारकडून परवानगी घ्यायला हवी हाेती. मात्र ही परवानगीही घेण्यात आलेल ...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा बंगल्यावर झालेल्या या बैठकीला स्वत: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, शिवसेनेचे मंत्री सुभाष देसाई, अनिल परब आदी उपस्थित ...
NIA has seized a black colour Mercedes Benz : एनआयएने आज एक मर्सिडिझ गाडीही जप्त केली आहे. तसेच ही मर्सिडिज गाडीच्या सचिन वाझेंशी असलेल्या कनेक्शनबाबतही माहिती दिली आहे. ...
Sachin Vaze : मनसुख हिरेन हे गायब होण्याआधी त्यांनी या कारने प्रवास केल्याचं तपासात उघड झालं आहे. त्यामुळे मनसुख हिरेन प्रकरणात मोठा खुलासा हिऱ्यांची शक्यता नाकारता येत नाही. ...