१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. Read More
Mansukh Hiren murder and Antilia case update Sachin Vaze had heart blockages NIA court seeks medical report: उद्योगपती मुकेश अंबानी स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्याप्रकरणातील मुख्य संशयित सचिन वाझे यांच्याबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. ...
Sachin Vaze case : उद्योगपती मुकेश अंबानी धमकी आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात सचिन वाझेला मदत केल्याच्या संशयातून मीरा रोड येथील मीना जॉर्ज या महिलेची एनआयएने गुरुवारी तब्बल १३ तास चौकशी केली. ...
Mukesh Ambani Bomb Scare: २५ फेब्रुवारीला मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जिलेटनच्या स्फोटकांनी भरलेली गाडी आढळली होती, त्यानंतर ही गाडी अंबानी यांच्या घराबाहेरून हटवून येलो गेट पोलीस ठाणे परिसरात आणण्यात आली. ...
Sachin Vaze : स्फोटक कारच्या गुन्ह्यात मनसुख हिरेन यांनी अटक होण्यास नकार दिल्याने आणि आपले बिंग फुटू नये यासाठी त्यांच्या हत्येचा कट सचिन वाझेने विनायक शिंदेसमवेत रचला होता. ...
Sachin Vaze News : एनआयएच्या तपास पथकाने यासंबंधी १७ फेब्रुवारीपासून ते ५ मार्चपर्यंतच्या सर्व घटना व त्यांच्या गुन्ह्याची सर्व संगती जुळवली आहे. गाडीत ठेवलेल्या २० जिलेटीनच्या कांड्या नागपूरमधील एका कंपनीच्या असून, वाझेने त्या वसईतील एकाकडून, तर ...