राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत. Read More
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) या नावाच्या संस्थेची नोंदणी केली जाऊ शकत नाही असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी पुन्हा एकदा स्पष्ट केले व या संस्थेला नोंदणी नाकारण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती अमान्य केली. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही धर्मनिरपेक्ष संघटना असेल तर मी इंग्लंडची महाराणी आहे आणि हे ट्वीट चंद्रावरून करत आहे अशा शब्दात मुफ्तींनी संघाला खोचक टोला लगावला आहे. ...
साधारणत: राज्यपालपद हे धर्म, पंथ, भाषा, पक्ष, संघटना, राजकारण यांच्या चौकटीत बसत नाही. राज्यपालपदावर बसल्यानंतर कुणाचीही बाजू न घेता निष्पक्षपणे भूमिका मांडावी लागते. मात्र राज्याचे राज्यपाल चे.विद्यासागर राव यांनी मंगळवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर ...