‘विराट कोहली आणि मी दोघेही आक्रमक स्वभावाचे आहोत. त्यामुळे काहीच अडचण येत नाही. विशेष म्हणजे आम्ही दोघेही आव्हान स्वीकारण्यास कायम सज्ज असतो. आमच्यामध्ये काहीच फरक नाही,’ असे मत भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले. ...
धोनी आणि कोहली यांच्यामध्ये विस्तवही जात नाही, असं फक्त प्रसारमाध्यमांना वाटतं. पण त्यांच्यामध्ये चांगले नाते आहे. ते दोघे एकमेकांचा सल्ला घेतात आणि ते चांगले मित्रही आहेत. ...
जेव्हा भारतीय संघ अडचणीत सापडला होता तेव्हा त्यांना संचालक हे पद भूषवण्यासाठी दिले होते. या एका वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी भारतीय संघापुढील जवळपास सर्व अडचणींवर मात केली. त्यानंतर एका वर्षाच्या कालावधीनंतर त्यांची संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियु ...
क्रिकेटमधल्या 22 यार्डाच्या खेळपट्टीवर बऱ्याच खेळाडूंची जोरदार बॅटींग साऱ्यांना परवलीचीच. पण क्रिकेटबरोबर काही खेळाडूंनी प्रणयाच्या खेळपट्टीवरही जोरदार बॅटींग केल्या बऱ्याच गोष्टी यापूर्वीही घडल्या आहेत. त्यामधल्या काही प्रकाशझोतात आल्या तर काही मंद ...
मैदानात कोहली फार आक्रमक दिसतो. काही प्रसंगी तो प्रतिस्पर्धी खेळाडूंना धारेवरही धरतो. कधीकधी तर अपशब्दही वापरताना दिसतो. पण तो संघातील खेळाडूंशीही तसाच वागतो का, याची उत्सुकता साऱ्यांनाच आहे. ...
धोनीचे संघातील संस्थान खालसा झाल्यावर, कोहलीने काही खेळाडूंना आपल्या गटात सामील केले. आपल्या आवडीचा संघ बांधला. रवी शास्त्री यांनी प्रशिक्षकपदी आणण्यासाठी कोहलीने बीसीसीआयलाही झुकवले. त्यादरम्यान धोनीचे संघातील स्थान धोक्यात आल्याचे म्हटले जात होते. ...