रमेश भाटकर हे प्रसिद्ध गायक संगीतकार वासूदेव भाटकर यांचे सुपुत्र आहेत. त्यांचा जन्म ३ ऑगस्ट १९४९ ला झाला. त्यांना अजून दोन भावंडं असून त्यांचे बालपण मुंबईत गेले आहे. कॉलेज जीवनात ते स्विमिंग चॅम्पियन होते. रमेश भाटकर यांनी अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केले असले तरी रंगभूमी हे त्यांचे पहिले प्रेम आहे. त्यांनी रंगभूमीवरूनच त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. अश्रूंची झाली फूले हे त्यांचे नाटक तर चांगलेच गाजले होते. Read More
कमांडर आणि हॅलो इन्स्पेक्टर या मालिकांनी रमेश भाटकर यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली आहे. त्यांनी माहेरची साडी, सवत माझी लाडकी असे एकाहून एक हिट चित्रपट दिले आहेत. ...