गुजरात व कर्नाटकचे दूध महाराष्ट्रात येऊ देणार नाही, अशी घोषणा देऊन आज डहाणू रेल्वे स्थानकात खासदार राजू शेट्टी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अहमदाबाद पॅसेंजरला अडविले ...
‘दूध आंदोलनाशी काहीही संबंध नसलेल्यांनी आमच्यामध्ये लुडबूड करू नये’ असा टोला खासदार राजू शेट्टी यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना नाव न घेता लगावला होता. ...
दूध उत्पादक शेतकरी मरत असताना सरकार दुधाला भाव देण्यासाठी रिलायन्सची दूध डेअरी आणि पतंजलीचे दूध बाजारात येण्याची वाट पाहत आहे का? असा संतप्त सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. ...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाची दरवाढ व शेतकऱ्यांच्या खात्यात थेट प्रति लीटर पाच रुपये जमा करण्याच्या मागणीसाठी पुकारलेल्या आंदोलनात सोमवारी प. महाराष्ट्रासह राज्यात शेतक-यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. ...
दुधाला दरवाढ मिळावी या हेतूने पुकारण्यात आलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व दूध उत्पादक शेतकरी व दूध संकलन करणाऱ्यांना दूध संकलन होऊ देऊ नये असे आवाहन पक्षातर्फे करण्यात आले. ...