साई दर्शन करुन शिर्डीवरुन शनिदर्शनासाठी निघालेल्या यवतमाळच्या भाविकांचा राहुरी येथे नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला. यात एक जागीच ठार तर अन्य दोघांचा नगरला रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. शनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. ...
शेवगाव तालुक्यातील ऊस दरावरुन पेटलेले आंदोलन ताजे असतानाच आता राहुरी तालुक्यातही उसाला ३१०० भाव मिळावा, यासाठी शेतकरी संघटनेने रास्ता रोको आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनामुळे महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ...
राहुरी तालुक्यातील गुहा येथील अंगणवाडी मदतनीस महिलेचा अत्यंत क्रूरपणे खून करण्यात आला असून, हा खून प्रेमसंबंधातून झाल्याचे पोलिसांनी सांगितले. बुधवारी (दि़ १५) सायंकाळी याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ...
ब्राम्हणी येथे सोमवारी देशमुख यांच्या शेतात ऊस तोडणी सुरु असताना अचानक बिबट्याने ऊस तोडणी मजूर तुकाराम सोनवणे यांच्यावर झडप घातली. त्यामुळे ऊस तोडणी मजुरांमध्ये एकच आरडाओरडा झाला. त्यामुळे घाबरुन बिबट्याने उसाच्या शेतात धूम ठोमली. ...