भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin 418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत. Read More
भारतीय संघ हा सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम संघांमध्ये आघाडीवर आहे. कसोटी, वन डे आणि ट्वेंटी-20 क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये हुकुमत गाजवण्याची क्षमता टीम इंडियात आहे. तसे प्रतिभावान खेळाडू टीम इंडियाकडे आहेत. पण, टीम इंडियातील अशा काही खेळाडू ...
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातला दुसरा वन डे सामना उद्या ऑकलंडच्या ईडन पार्कवर खेळवण्यात येणार आहे. यजमान न्यूझीलंड संघानं पहिल्या वन डे सामन्यात टीम इंडियाचे 348 धावांचे लक्ष्य सहज पार केले होते. ...