भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin 418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत. Read More
India vs Sri Lanka 1st Test: श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी सामन्यात आर अश्विनने कपिल देव यांना मागे टाकले, या रेकॉर्डच्या बाबतीत अनिल कुंबळे अव्वल स्थानावर आहेत. ...
India vs Sri Lanka, 1st Test Day 2 Live Updates : भारतीय संघाने पहिल्या कसोटीत वर्चस्व गाजवले आहे. पहिला डाव ८ बाद ५७४ धावांवर घोषित केल्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवसअखेर श्रीलंकेला बॅकफूटवर फेकले. ...
India vs Sri Lanka, 1st Test Day 2 Live Updates : रवींद्र जडेजाची शतकी खेळी, रिषभ पंत व आर अश्विन यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने पहिल्या कसोटीत श्रीलंकेसमोर धावांचा डोंगर उभा केला. भारताने ८ बाद ५७४ धावांवर पहिला डाव घोषित केला. ...
India vs Sri Lanka, 1st Test Day 2 Live Updates : कसोटीच्या दुसऱ्या दिवशी रवींद्र जडेजाने ( Ravindra Jadeja) सातव्या विकेटसाठी आर अश्विनसह शतकी भागीदारी केली. या दोघांच्या संयमी खेळाच्या जोरावर भारताने पहिल्या सत्रात वर्चस्व गाजवले. ...
R Ashwin, IPL 2022 Auction : भारताचा फिरकीपटू आर अश्विन याला राजस्थान रॉयल्सने आपल्या ताफ्यात दाखल केल्यानंतर सोशल मीडियावर तुफान मीम्स व्हायरल झाले. ...