जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला. देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते. जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला. Read More
पुलवामा येथील भीषण दहशतवादी हल्ल्याचे उट्टे काढण्यासाठी भारताने पाकिस्तानातील बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी प्रशिक्षण तळावर चढविलेल्या हवाई हल्ल्याचे कवित्व आणखी काही दिवस तरी सुरूच राहील असे दिसते. ...
दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई, अहमदाबाद, रतलाम, राजकोटमध्ये पश्चिम रेल्वेला हायअलर्ट देण्यात आला आहे. तसेच, पश्चिम रेल्वेवरील सर्व स्थानकांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. ...
जम्मू काश्मीरमधील बडगाम येथे बुधवारी झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत हवाई दलाचे सहा सैनिक शहीद झाले होते. दरम्यान, या दुर्घटनेत शहीद झालेले स्क्वॉड्रन लीडर सिद्धार्थ वशिष्ठ यांच्यावर पूर्ण सैनिकी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
मुंबई, अहमदाबाद, रतलाम, बडोदा, राजकोट आणि भावनगर रेल्वे सुरक्षा दलाच्या आयुक्तांना पश्चिम रेल्वेच्या मुख्य सुरक्षा आयुक्त, महानिरीक्षकांनी हे पत्र पाठवले आहे. ...
काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यानंतरच्या घडामोडी आणि सध्या भारत-पाकिस्तानमध्ये असलेल्या तणावपूर्ण स्थितीमुळे मार्चमध्ये कोल्हापुरातून काश्मीरला जाणारा १५ हजार पर्यटकांचा दौरा रद्द करण्यात आला आहे. ...
भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज 57 मुस्लिम देशांची संघटना असलेल्या ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को ऑपरेशन (OIC) ला संबोधित केले. ...