जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला. देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते. जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला. Read More
भाजपा निवडणुकांच्या तोंडावर युद्धजन्य परिस्थिती निर्माण करेल, हे आधीच सांगितल्याची आठवण करून देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुलवामा हल्ला, एअर स्ट्राइकवर संशय व्यक्त केला. ...
जोश, उत्साह, नवचैतन्य असे तरुणाईबद्दल म्हटले जाते. दुसरीकडे याच तरुणाईला भरकटलेली तरुणाई म्हणून सन्मानाची वागणूकही मिळत नाही. परंतु अशा बिरुदापासून स्वत:ला दूर ठेवून काहीतरी आगळेवेगळे करण्याची जिद्द तरुणाईमध्येच असते. असाच एक आगळावेगळा उपक्रम उपराजधा ...
देशाचा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नेमकं करतो काय, तो कसला सल्ला देतो, असा प्रश्नही विचारत राज यांनी पुलवामा हल्ल्याची जबाबदारी अजित डोवाल यांची नव्हती का, असा प्रश्न उपस्थित केला आहे. ...
अमेरिकेच्या न्यूयॉर्क टाइम्सच्या दैनिकाने पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना बळ दिलं जात असल्याचं सांगितले. तसेच यूरोपीय संघाने पुलवामा हल्ल्याच्या एक दिवस अगोदरच पाकिस्तान राष्ट्राला हाय-रिस्क सूचीमध्ये टाकलं होतं. ...
ज्यांच्या रक्तात भारत आहे, त्यांना एअर स्ट्राइकवर संशय येईल का ? जे भारत माता की जय बोलतात ते या संशय येईल का ? जे लोक स्ट्राइकवर संशय उपस्थित करतात त्यांच्यावर भरोसा ठेवणार का ? असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला ...
नवी दिल्लीत आज भारतीय परराष्ट्र खात्याकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत परराष्ट्र खात्याने पाकिस्तान सरकारला लक्ष्य करत पाकिस्तानची कानउघडणी केली. ...