जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला. देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते. जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला. Read More
लोकसभा निवडणुका एका भीषण हल्ल्याचे भांडवल करून नव्हे तर गरीबी, आरोग्याचे प्रश्न अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर लढल्या गेल्या पाहिजेत, असे काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी म्हटले आहे. ...
मावळ लोकसभा मतदार संघात पार्थ पवार यांच्या प्रचार सभेत बोलताना पवार यांनी मोदी सरकारला पुलवामा हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचे हल्ले पाकव्याप्त काश्मिरमध्ये जाऊन उध्वस्त करण्याचा सल्ला आपणच दिला होता असे वक्तव्य केले होते... ...
काश्मीर सीमेलगत पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. जम्मू काश्मीरच्या पुलवामामधील केरी, बटल यापरिसरात रविवारपासून पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरू आहे ...