एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या प्रेमिकांची कथा आपण आजवर अनेकवेळा बघितली आहे, या चित्रपटाच्या निमित्ताने अपघाताने प्रेमात पडलेल्या प्रेमवीरांची कथा पहायला मिळणार आहे. सीएमएस एन्टरटेन्मेंट निर्मिती संस्थेच्या 'प्रेम योगायोग' या चित्रपटाची निर्मिती सुशील शर्मा यांची असून दिग्दर्शन नितीन कांबळे यांचे आहे. या चित्रपटात विक्रांत ठाकरे, मधुरा वैद्य या फ्रेश जोडीसोबत अरुण नलावडे, संजय मोने, शुभांगी लाटकर, तन्वी हेगडे सोबत पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत सुशांत शेलार दिसणार आहे. Read More