शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे प्रवीण दरेकर Pravin Darekar हे सुरुवातीला राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सक्रीय होते. शिवसेनेतील आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. दरेकरही राज ठाकरेंसोबत आले. मनसेच्या तिकीटावर मागाठणे मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही जिंकली. २००९ ते १४ या कालावधीत ते मनसेचे आमदार होते. २०१४मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला. ते मागाठणेमधून तिकीटासाठी आग्रही होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. दरेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आहे. Read More
अनेक वर्षांपासून मुंबै बँकेवर प्रविण दरेकरांची सत्ता आहे. यावेळीही सर्वच्या सर्व जागा जिंकत प्रविण दरेकरांनी घवघवीत यश मिळवलं. पण हा आनंद जास्त काळ टिकला नाही. कारण ज्या प्रवर्गातून ते निवडून आले त्यांना अपात्र ठरवल्याने त्याचा राजीनामा त्यांनी दिलाय ...
मुंबै जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत प्रवीण दरेकर यांचा एकहाती विजय झालाय. याच निवडणुकीत दरेकर मजूर म्हणून निवडणूक लढवत होते. प्रवीण दरेकर यांच्या सहकार पॅनेलनं सर्वच्या सर्व 21 जागा जिंकल्या. विशेष म्हणजे दरेकर जिंकले त्या पॅनलमध्ये भाजपशी संबं ...
Pravin Darekar Mumbai Bank : करोडपती दरेकर... म्हणजेच प्रवीण दरेकर हे मजुरी का करतात? या एका साध्या... पण सरळ नसलेल्या प्रश्नाभोवती आपण या व्हिडीओत बोलूयात... कारण विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे मानले जाण ...