शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे प्रवीण दरेकर Pravin Darekar हे सुरुवातीला राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सक्रीय होते. शिवसेनेतील आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. दरेकरही राज ठाकरेंसोबत आले. मनसेच्या तिकीटावर मागाठणे मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही जिंकली. २००९ ते १४ या कालावधीत ते मनसेचे आमदार होते. २०१४मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला. ते मागाठणेमधून तिकीटासाठी आग्रही होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. दरेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आहे. Read More
भाजपमध्ये पक्षाच्या नेत्यांची तोंडे वेगवेगळ्या दिशेला आहेत. वादग्रस्त वक्तव्ये सुरूच आहेत. कोणीही कोरसमध्ये गात नाही. त्यामुळे संगीतही बेसूर झाले आहे. ...
उर्मिला मातोंडकर यांनी आज 'मातोश्री'वर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी उर्मिला यांना शिवबंधन बांधून त्यांचं पक्षात स्वागत केलं. ...
Praveen Darekar , law against love jihad in the state उत्तर प्रदेश सरकारने लव्ह जिहाद विरोधात कायदा आणण्याचा निर्णय घेतला आहे. तेथे भाजपचेच सरकार असून त्या कायद्याला आमचे पूर्णत: समर्थन आहेच. उत्तर प्रदेशमध्ये जी भूमिका आहे तीच महाराष्ट्रातदेखील कायम ...