शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे प्रवीण दरेकर Pravin Darekar हे सुरुवातीला राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सक्रीय होते. शिवसेनेतील आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. दरेकरही राज ठाकरेंसोबत आले. मनसेच्या तिकीटावर मागाठणे मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही जिंकली. २००९ ते १४ या कालावधीत ते मनसेचे आमदार होते. २०१४मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला. ते मागाठणेमधून तिकीटासाठी आग्रही होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. दरेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आहे. Read More
नवाब मलिक यांचे डोके ठिकाणावर आहे का हे तपासण्याची गरज आहे. तसेच एखाद्या मानसोपचारतज्ज्ञांकडून त्यांची तपासणी करण्याची आवश्यकता आहे, असे म्हटले आहे. ...
या कार्यक्रमादरम्यान दरेकर म्हणाले, सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा, वराती मागे घोडे नाचून उपयोग नाही. मराठवाडा उद्धवस्त झाला आहे, अशावेळी तात्काळ मदत देणे गरजेचे आहे ...
pravin darekar News: डोंबिवलीतील अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना ही माणूसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेवरुन पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे की, राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे ...
भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर अध्यक्ष असलेल्या मुंबै जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कारभाराच्या चौकशीचे आदेश राज्याच्या सहकार खात्याने दिले आहेत. ...