शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे प्रवीण दरेकर Pravin Darekar हे सुरुवातीला राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सक्रीय होते. शिवसेनेतील आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. दरेकरही राज ठाकरेंसोबत आले. मनसेच्या तिकीटावर मागाठणे मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही जिंकली. २००९ ते १४ या कालावधीत ते मनसेचे आमदार होते. २०१४मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला. ते मागाठणेमधून तिकीटासाठी आग्रही होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. दरेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आहे. Read More
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: कर्नाटक, झारखंड, लोकसभेला ईव्हीएमवर दोषारोप केले नाहीत. आता नैतिकता म्हणून विरोधकांचे निवडून आलेले आमदार राजीनामा देणार का, असा सवाल भाजपा नेत्यांनी केले आहे. ...
भाजप नेते प्रविण दरेकर यांनी, "जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा अशा प्रकारचे नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो," असे प्रत्युत्तर देत पलटवार केला आहे... ...
Manoj Jarange Maharashtra Election: मनोज जरांगे पाटलांनी महायुतीला विशेषतः भाजपाविरोधात जाहीरपणे भूमिका मांडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भाजपानेही आक्रमक पवित्रा घेतला असून, प्रवीण दरेकर यांनी जरांगेंना खुलं आव्हान दिलं आहे. ...
Sharad Pawar Lalbaugcha Raja : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत लालबागचा राजा गणपतीचे दर्शन घेतले. त्यांच्या दर्शनानंतर भाजपने पवारांना निशाणा साधला. ...
Maharashtra News : भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी संजय राऊतांनी अमित शाहांबद्दल केलेल्या विधानावर संताप व्यक्त केला. मुस्लीम मतांसाठी असे विधान केले असल्याचे दरेकर म्हणाले. ...