शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे प्रवीण दरेकर Pravin Darekar हे सुरुवातीला राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सक्रीय होते. शिवसेनेतील आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. दरेकरही राज ठाकरेंसोबत आले. मनसेच्या तिकीटावर मागाठणे मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही जिंकली. २००९ ते १४ या कालावधीत ते मनसेचे आमदार होते. २०१४मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला. ते मागाठणेमधून तिकीटासाठी आग्रही होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. दरेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आहे. Read More
CM Uddhav Thackeray stopped his car for BJP leaders in assembly premises : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांमध्ये विधिमंडळाच्या परिसरात हास्यविनोद ...
obc reservation: भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांनी OBC आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही, तर राजीनामा देणाचं धाडस दाखवणार का, असा सवाल केला आहे. ...
राजकारण हे चंचल असतं त्यामुळे २०२४ सालच्या निवडणुकीचे आडाखे तुम्ही काही आत्ताच बांधू शकत नाही, असं विधान शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये केलं. ...